ताज्या घडामोडी

कोरेगाव:-श्री गाडगे महाराज मिशन मुंबई चे चेअरमन मा.श्री.मधुसूदन मोहिते पाटील (दादा) यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन कार्यक्रम.

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

RPS STAR NEWS

श्री गाडगे महाराज मिशन मुंबई चे चेअरमन मा.श्री.मधुसूदन मोहिते पाटील (दादा) यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन कार्यक्रम.

श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मा.श्री.मधुसूदन मोहिते पाटील (दादा) यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ब्रह्मपुरी येथील श्री गाडगे महाराज आश्रमशाळेत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात अभिष्टचिंतन कार्यक्रम व स्नेहमेळावा संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या प्रतिमापूजनाने झाली.

यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते आश्रमशाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीसाठी नवीन निर्माण केलेल्या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन यानिमित्ताने करण्यात आले. या सर्व वर्गांसाठी स्वतंत्र स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप व नवनीत एज्युकेशनल सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अभिष्टचिंतन कार्यक्रम प्रसंगी इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु.सायली दंडिले हिने दादांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता गीत सादर केले.

त्यानंतर दादांचे ५० दिव्यांनी औक्षण करण्यात आले.
दरम्यान इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे गीत सादर केले.

त्यानंतर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश वितरण करण्यात आले.

कु.प्रणिता शिंदे व कु.हर्षदा दंडीले या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करताना दादांचे आश्रमशाळा परिवारावर असणाऱ्या प्रेमाचे अनुभव व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

भक्ती मोहिते हिने केलेल्या मनोगताने सर्वांच्याच हृदयाचा ठाव घेतला. यावेळी तिने दादांच्या स्वभाववैशिष्ठांचा उलगडा करून ते आमच्यासाठी नेहमीच आदर्श आहेत असे सांगितले. तिच्या भावनिक शब्दांनी उपस्थितांचे डोळे पाणावले.

आश्रमशाळेचे माजी विद्यार्थी प्रा.डॉ.अर्जुन जाधव यांनी त्यांचे शालेय जीवनात दादा व त्यांचा परिवार यांनी केलेल्या संस्कारामुळे आम्ही जीवनात यशस्वी झाल्याचे सांगून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांनी स्वातंत्रसैनिक वै.ह.भ.प जिजाबा मोहिते पाटील सोहोलीकर (बाबा) व आई यांच्या आठवणींना उजाळा दिला.

श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे खजिनदार मा.श्री.ज्ञानदेव महाकाळ पाटील यांनी आपल्या मनोगतात दादांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या संस्थेच्या यशस्वी वाटचालीची माहिती सांगितली

संस्थेचे सचिव मा.श्री विष्णूभाऊ नाचवणे यांनी दादांची सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धती आदर्श असल्याचे सांगितले.

संस्थेचे सचिव मा.श्री. सचिनभाऊ घोंगटे यांनी आपल्या मनोगतात दादांचे व्यक्तिमत्व, कार्यक्षमता व दृष्टीकोन याच्या जोरावर मिशन प्रगतीची वाटचाल करत असल्याचे मत व्यक्त केले.

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.सुनीलराव माने (भैय्यासाहेब) यांनी त्यांच्या व दादांच्या मैत्रीविषयी भरभरून सांगितले. एक आदर्श संस्थाचालक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे दादा आहेत असे सांगून त्यानंतर दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

नातेवाईक प्रतिनिधी म्हणून किरण शिंदे,जयश्री साळुंखे, विद्या चव्हाण व पुष्पा जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी मधुसूदन मोहिते पाटील (दादा) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आमच्या आश्रमशाळा परिवारातील मुलांच्या माझ्याबद्दलच्या भावना हाच माझा खरा आनंद आहे असे सांगून हे विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उज्वल यश संपादन करत आहेत ही माझी खरी कमाई आहे व त्याचा मला खूप अभिमान आहे असे सांगितले व आजवरच्या वाटचालीत ज्यांचे ज्यांचे मार्गदर्शन, सहकार्य, प्रेम लाभले त्यांच्याप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक श्री.संतोष जाधव यांनी व सूत्रसंचालन श्री. महेशकुमार बोभाटे यांनी केले. माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक सौ.भारती मोहिते यांनी आभार मानले.

कार्यक्रमासाठी संस्थेचे खजिनदार श्री. अशोक पाटील, कार्यकारिणी सदस्य श्री. अनिल आवटे, श्री. सुनील बायस्कर, श्री. अजित टेमकर, पोलीस उपअधीक्षक श्री.सजन हंकारे, सहायक पोलिस निरीक्षक श्री. शिवाजीराव विभूते, माजी नगराध्यक्ष प्रा.भानुदास भोसले, श्री. दिलीप कदम, श्री.भागवत घाडगे, ऍड.अशोकराव पवार, श्री. नाना राऊत, श्री. विक्रम माने, श्री. दशरथ माने यांच्यासह दादांच्यावर प्रेम करणारी परिसरातील मान्यवर मंडळी, नातेवाईक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button