ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपुर :- ट्रक – रिक्षाच्या धडकेत रिक्षाचालक ठार …
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS
श्रीरामपुर :- ट्रक – रिक्षाच्या धडकेत रिक्षाचालक ठार …
श्रीरामपूर ( RPs स्टार न्युज ) श्रीरामपुरातील ओव्हरब्रिज जवळ ट्रक आणि रिक्षाच्या झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकाचा टुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी सायंकाळी ४ – 30 च्या दरम्यान श्रीरामपूर कडून नेवासाच्या दिशेने जात असलेल्या ट्रकने श्रीरामपूरच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाला धडक दिल्याने रिक्षा चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर रिक्षाचालक अशोकनगर येथील रहिवाशी असल्याचे समजले. या भीषण अपघातामध्ये ट्रकच्या धडकेत रिक्षा पुर्णपणे दाबल्या गेल्याने क्रेनच्या साह्याने टूकला बाजुला करून रिक्षा चालकाला बाहेर काढण्यात आले. अपघात झाल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.