ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत सुमारे चारशे परवाने वितरित.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

सातारा लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत सुमारे चारशे परवाने वितरित.

सातारा दि: ४५ सातारा लोकसभा मतदार संघात उन्ह व प्रचाराचा चांगलाच जोर वाढलेला आहे. अशा वेळेला एक खिडकी कक्षा द्वारे परवाने देण्यात येत आहेत .त्यानुसार आतापर्यंत सुमारे चारशे परवाने निर्गमित करण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्याकडेच जास्त परवाने आहेत.
सातारा लोकसभा मतदार संघासाठी आत्तापर्यंत वाहन परवाना, सभा परवाना, पदयात्रा, रॅली, तात्पुरती प्रचार कार्यालय, कार्यकर्त्यांचा मेळावा, फ्लेक्स, पथनाट्य ,हेलिकॉप्टर उतरवणे, इतर स्वागत मिरवणुकीमध्ये वाहन चालवण्याचा परवाना, ध्वनिषेपक, बॅनर झेंडे व लीड स्क्रीन द्वारे जाहिरात त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रम व मैदान उपलब्ध करणे. अशांसाठी परवाने काढणे आवश्यक आहे .सध्या लग्नसराई व यात्रा जत्रा यांची रेलचेल असल्यामुळे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम याद्वारे सुद्धा उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. यामध्ये व्यवसाय उद्घाघाटन पुण्यतिथी, गावदेव, लग्नाची वरात ,उरूस कुस्ती अनुमती यासारखेही परवाने काढण्यात आलेले आहेत.
आता निवडणुकीला पाच दिवसाचा अवधी उरलेला असून व्यक्तिगत पातळीवर कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपली भूमिका समजावून सांगत आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी एकूण १८ लाख ८८ हजार६०५ मतदार असून त्यामध्ये शासकीय सेवेत असलेले ९५८५ मतदार हे पोस्टल बॅलेट द्वारे मतदान करत आहेत. त्याचप्रमाणे वयोवृद्ध व दिव्यांग यांचेही मतदान झाले आहे. आतापर्यंत राजकीय पक्ष प्रतिनिधी व उमेदवार यांनी लोकशाही व आचारसंहितेचे काटेकोरपणाने पालन करून या लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी व्हावे .यासाठी शासकीय पातळीवरही प्रयत्न सुरू आहेत.
नवीन मतदारांची संख्या दीड लाख असल्यामुळे तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी तथा सातारा जिल्हा अधिकारी जितेंद्र डूडी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भगवान कांबळे व नूडल अधिकारी अभिजीत पाटील व अन्य निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात मे रोजी सर्व मतदारांनी मतदान करावे. यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. ज्या ठिकाणी यापूर्वी मतदान कमी झालेले आहे. त्याची कारण पाहून त्या ठिकाणी उपाय योजना राबवण्यात आलेले आहेत. एकूणच उन्हाची तीव्रता पाहता सर्व सुख सुविधा उपलब्ध केल्यामुळे किमान ७० ते ७५ टक्के किंवा त्याहीपेक्षा जास्त मतदान होईल. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कार्यकर्ते व नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून गावातील प्रत्येक मतदारांनी मतदान केलेच पाहिजे यासाठी प्रयत्न करावा. अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

——————————–+————
चौकट-राजकीय पक्षांनी प्रचार यंत्रणा सुलभ व सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी अनेक कार्यकर्त्यांकडे जबाबदारी दिलेली आहे. त्यासाठी वेगळा कक्ष, बूथ प्रमुख, मतदान केंद्र प्रमुख अशी पदे दिलेली आहेत. परंतु मतदान शंभर टक्के व्हावे यासाठी सुद्धा कार्यकर्त्यांकडे राजकीय मत व राष्ट्रीय कर्तव्य या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून त्या दृष्टीने ही मतदान वाढीसाठी सहकार्य करावे. असेही बोलले जाऊ लागले आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button