ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मावळ पंचायत समितीच्या बारा गणांची आरक्षण सोडत उद्द्या.
प्रतिनिधी:-धर्मेंद्र ठाकर मावळ :-9960044802

*मावळ पंचायत समितीच्या बारा गणांची आरक्षण सोडत उद्या*
वडगाव मावळ- मावळ पंचायत समितीच्या बारा गणांची आरक्षण सोडत उद्या गुरुवार दिनांक २८ रोजी वडगाव येथील भेगडे लॉन्स येथे सकाळी ११ वाजता पार पडणार असल्या ची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे आणि नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली आहे.
पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडत वडगाव येथे होणार असून जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत पुणे येथे होणार आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाला न्यायालयाने हिरवा कंदील दिल्याने आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत ओबीसी समाजातील इच्छुकांना न्याय मिळेल काही इच्छुकांनी विविध कार्यक्रम घेऊन लाखो रुपये खर्च केले आहेत. एवढे करूनही आरक्षण दुसरे निघाल्यास खर्च वाया जाईल अशी इच्छुकांच्या मनात धाकधुक वाढलेली दिसत आहे.