आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

सातारा:-कुवेत मध्ये जयंतीदिनी दीप प्रज्वलन करताना कवी दंगलकार चंदनशिवे.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

सातारा:-कुवेत मध्ये जयंतीदिनी दीप प्रज्वलन करताना कवी दंगलकार चंदनशिवे.

कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी
सातारा – कुवेत मध्ये धम्म ग्रुपच्या वतीने फुले आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील प्रसिद्ध विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे या समारोहास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात त्यानंतर भीम गीतांचा कार्यक्रम झाला. नितीन चंदनशिवे यांनी आपल्या विद्रोही कवितांनी उपस्थीतांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी धम्म गटाचे वतीने वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलांना महान व्यक्तींच्या विचारांशी जोडण्यासाठी सर्व मुलांना डॉ. आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या पुस्तकांचे वाटप केले.
कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशील आणि भीमस्तुतीच्या पठनाने झाली. त्यानंतर धम्म गटाच्या मुलांमुलींनी आणि महिलांनी सादर केलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी समारोहात रंगत आणली.
———————————————–

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button