माचास संचलित टी डी एल ग्रुप महा राज्य _सभासदास १००,०००/₹ ची आर्थिक मदत.
प्रतिनिधी:- प्रमोद देवाडिगा:-9623714741

*माचास संचलित टी डी एल ग्रुप महा राज्य*
_सभासदास १००,०००/₹ ची आर्थिक मदत_
मालवाहतूक चालक-मालक सामाजिक विकास संस्था वाहन चालक सभासद श्री.कै राजेश तुळशीराम बोरकर मु पो ईसाद ता गंगाखेड जी परभणी वय वर्ष ३० यांचा दिनांक २९/७/२०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या पाठीमागे
आई वडील भाऊ पत्नी व एक मुलगा आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे
माचास संचलित टी डी एल ग्रुप महा राज्य सामाजिक हितचिंतक बांधिलकी मदत सहकार्य तत्त्वावर आधारित मासिक सामाजिक जमा फंड रक्कम प्रकल्पातून त्यांच्या पत्नीस मिरा राजेश बोरकर यांना मुलांच्या शिक्षणासाठी १००,०००/-₹ चेक देण्यात आला
कोरोनाच्या भयानक काळात माणुसकी च्या नात्यातून सर्व चालक-मालक लोकांना एकत्रित घेऊन जगावर आलेल्या संकटावर संघटित करून आर्थिक मात यशस्वीरित्या नकारार्थी लोकांना परिश्रमाने प्रेरित करून नियम अटी नुसार माणुसकी हाच धर्म.. आणि माणुसकी हीच जात.. आमचा सदैव सामाजिक मदतीस हात या संकल्प तत्त्वावर आधारित माचास संचलित टी डी एल ग्रूप महा राज्य संस्थापक / अध्यक्ष धनराज दादासाहेब दगडे ( भाऊ ) यांच्या सामाजिक दूरदृष्टी विचारसरणीतून प्रकल्पाची स्थापना करण्यात आली होती