सातारा:-नागरिकांच्या समस्येसाठी पुन्हा नगरसेवक सुनील काळेकर उतरले रस्त्यावर….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
नागरिकांच्या समस्येसाठी पुन्हा नगरसेवक सुनील काळेकर उतरले रस्त्यावर….
सातारा दि:सातारा शहरातील रस्त्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहरांमध्ये नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सुसज्ज वाहतूक करण्यासाठी रस्ते असावेत. अशी सातत्याने आग्रहाची भूमिका मांडणारे भाजपचे नगरसेवक सुनील काळेकर यांनी आज वाहनचालक व नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी साताऱ्यात पर्यावरण दिनी रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करून आपण नागरिकांसोबत असल्याचे सिद्ध करून दाखवले. पुन्हा एकदा नगरसेवक सुनील काळेकर रस्त्यावर उतरल्यामुळे वाहन चालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
याबाबत माहिती अशी की, सातारा नगरीच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते व सध्याचे सातारा नगरपरिषदेचे नगरसेवक सुनील काळेकर यांनी सक्षम विरोधी पक्ष कार्यकर्ता म्हणून यापूर्वी अनेक आंदोलन केली होती .
साताऱ्यातील कचरा त्वरित उचलून घेऊन जावे. यासाठी सातारचे तात्कालीन सातारा नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये कचरा टाकला होता. रास्ता रोको आंदोलन करून समस्या सोडवण्यास हातभार लावला होता. नागरिकांचे आरोग्य, घरपट्टी वाढ स्थगिती, पिण्याचे पाणीपुरवठा व्हावा. यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेणे. अशी त्यांची ख्याती होती. परंतु, सध्या महायुतीचे सरकार आणि भारतीय जनता पक्षाचे आदरणीय नेते तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामुळे आक्रमक आंदोलन करण्यामध्ये आणि दुसऱ्या बाजूला सत्तेत सहभाग अशा कात्रीत सापडलेल्या कार्यकर्त्यांनी जनतेसाठी आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन केले. ही कौतुकास्पद बाब ठरली आहे.
यामुळे खऱ्या अर्थाने भाजपमधील सर्वसामान्य माणसांची असलेली नाळ दिसून आलेली आहे. रस्त्यासाठी कुणीतरी आंदोलन करणे गरजेचे असतानाच भाजपनेच नगरसेवक सुनील काळेकर यांच्या माध्यमातून आंदोलन केल्यामुळे सातारा शहर परिसरातील नागरिकांना समाधान वाटले .
आज सातारचे नगरसेवक सुनील काळेकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिक व भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने वाजत गाजत आंदोलन केले. नगरपालिका ,सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर विभागाला यापूर्वी लेखी व तोंडी स्वरूपात समस्या मांडल्या आणि आम्ही सत्तेत असल्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी सहकार्याची अपेक्षा ठेवली. परंतु, सातारा नगरपालिका प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय हे आमचे नेते आहेत. ते प्रामाणिकपणाने विकास कामासाठी निधी आणतात तसेच वरिष्ठ पातळीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपयुक्त सूचना करतात. परंतु, काही ठेकेदार हे आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्यासाठी निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यांच्या विरोध हे आंदोलन आहे. ही बाब सामान्य नागरिकांच्या आंदोलनातील वाढत्या सहभागाने सिद्ध झाले आहे. आज लोकशाही मार्गाने रस्त्यात पडलेल्या खड्ड्यावर विशेषतः सातारा शहर पोलीस ठाणे ते बस स्थानक आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, गोडोली , शिवतीर्थ, पोवई नाका या परिसरातील सामान्य नागरिकांच्या सहभाग या आंदोलन होता. याचा अर्थ आम्हाला सत्तेच्या कौतुक नसून सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही रस्त्यावरील कार्यकर्ते आहोत. त्यामुळे सामान्य नागरिकांनी सत्तेचा लाभ घ्यावा. यासाठी आम्ही वेळेप्रसंगी आंदोलन करण्यास ही तयार आहे. हा संदेश गेल्यामुळे भारतीय जनता पक्ष व मंत्री महोदयाची प्रतिमा उजळली आहे .
यामध्ये कोणतेही राजकारण नसून एखादी मोठी शिकार करून जशा पद्धतीने अजगर शांत निवांत बसलेला असतो. तशा पद्धतीने नगरपालिका व जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी व सराईत ठेकेदार अजगराच्या भूमिकेत आहेत. त्यांना लोकशाहीच्या आंदोलनात खोचारा लावण्यासाठी आंदोलन होते. सातारा शहरात रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांमुळे मंत्री महोदयांची प्रतिमा डागडली जाते हे आम्ही कदापि सहन करणार नाही. दूध का दूध और पानी का पानी करण्यासाठी हे आंदोलन आहे. असा संदेश दिला आहे. असे सुनील काळेकर यांनी स्पष्ट केले. अजय शिवदास, जयश्रीताई काळेकर , प्रसाद चव्हाण, विजय बैताडे, मनोज अवघडे, जॅक पाटोळे, अक्षय वनारे ,वैभव हादगे, सचिन दीक्षित ,गणेश कारंडे, बॉबी गुप्ता, दत्तात्रय ढमाळ, संभाजी यादव यांच्या सह स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल सोनम काळे कर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.