ताज्या घडामोडी

सातारा:-एडवोकेट श्रीराम देव ज्योतिष जीवन रत्न पुरस्काराने सन्मानित.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

RPS STAR NEWS

एडवोकेट श्रीराम देव ज्योतिष जीवन रत्न पुरस्काराने सन्मानित.

महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या 36 व्या दीक्षांत सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या 62 विद्यार्थ्यांना ज्योतिष शास्त्री पदवी बहाल करण्यात आली. त्याचबरोबर ज्यांचे वय 70 झालेले आहे आणि ज्यांनी पंधरा वर्षापेक्षा जास्त ज्योतिष वर्ग शिकवले आहेत अशा ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला यापैकी सातारा जिल्ह्यातील एकमेव अडवोकेट श्रीराम भालचंद्र देव यांना ज्योतिष जीवन रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार जेष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विनायकराव गोविलकर संस्कृत विश्वविद्यालयाचे नाशिक परिसर निर्देशक गोविंद पांडे ,महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष अनिल चांदवडकर ,यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान चिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले एडवोकेट श्रीरामदेव ज्योतिष मंडळ सातारा चे सचिव असून त्यांनी विशारद पंडित शास्त्री हे वर्ग चालवले आहेत त्यांचे अनेक विद्यार्थी पहिल्या श्रेणी उत्तीर्ण झाले असून अनेकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे तर काहींनी ज्योतिष ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत त्यांना एप्रिल 2023 मध्ये वराह मिहीर मुक्त विद्यापीठामार्फत ज्योतिर विद्या वाचस्पती पीएचडी प्रदान करण्यात आली आहे ज्योतिष मंडळाबरोबर त्यांचा अनेक संस्थांशी जिव्हाळ्याची संबंध आहे त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य रमणलाल शहा, गोविंद कोष्टी, सौ सपना पवार, महेश कुलकर्णी, प्राध्यापक दिलीप पुस्तके, सौ पदमा. कासट, मनोज जोशी, संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार जोशी, अंजली रांजणे, राखी कदम, अश्विनी शेटे, अस्मिता सावंत, रोहन भुसारे, व अनेकांनी अभिनंदन केले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button