ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

साताऱ्यात महायुतीची ताकद दाखवण्यासाठी सर्वांनी हजर राहण्याचे आवाहन.

पत्रकार जेष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार जेष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

साताऱ्यात महायुतीची ताकद दाखवण्यासाठी सर्वांनी हजर राहण्याचे आवाहन.

सातारा दि: महायुतीच्या सातारा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचा गुरुवार दिनांक १८ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या वेळेला मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हजर राहणार असून या वेळेला महायुतीची ताकद दाखवण्यासाठी संपूर्ण जावली व सातारा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी हजर राहावे असे नम्र आवाहन सातारा जावलीचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सातारा येथे केले.
सातारा येथील सुरुची बंगल्यावर झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळेला रामभाऊ जगदाळे ,लालासाहेब पवार, चंद्रकांत जाधव, विक्रम पवार, यशवंत साळुंखे, ज्ञानेश्वर रांजणे, जयदीप शिंदे, अविनाश कदम, राजू भोसले, फिरोज पठाण, सयाजी चव्हाण , श्रीहरी गोळे, सौरभ शिंदे, अरविंद चव्हाण, नामदेव सावंत, धर्मराज घोरपडे, बाळासाहेब खंदारे, शशिकांत महाडिक, अविनाश कदम, जयवंत भोसले, सतपाल फडतरे, बाळासाहेब मामुलकर आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. आदरणीय आ .शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा व जावली तालुक्यात विकास कामे गतीने झालेले आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्ते हे त्यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने शक्ती प्रदर्शनाला हजर राहणार आहेत.
आपल्याला आपल्या ताकतीवर शक्ती दाखवावी लागेल. कारण, आ शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना मंत्री म्हणून बघायचे असेल तर सातारा जावली तालुक्यातील आपल्याला मताधिक्य द्यावे लागेल. बाबा हाच आपला पक्ष समजून आपण काम केले पाहिजे. निवडणुकीच्या काळामध्ये यंत्रणा पाठवावी याची वाट न बघता स्वतःच्या ताकतीवर कार्यकर्त्यांनी निवडणुकीचा प्रचार करून महायुती अधिकृत उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवडून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलावा. अशा शब्दात ज्येष्ठ नेते लालासाहेब पवार यांनी विचार व्यक्त केले. महायुती मधील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या पमुख पक्षातील सर्वच नेते व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या शक्ती प्रदर्शना सोबतच मतदान होईपर्यंत सर्वांनी प्रामाणिकपणाने प्रचार करून पश्चिम महाराष्ट्रात कमळ चिन्ह हे साताऱ्यातच मताधिक्य मिळवणारा मतदारसंघ व्हावा असे काम करावे असे स्पष्ट करण्यात आले या वेळेला मोठ्या संख्येने सातारा व जावली तालुक्यातील कार्यकर्ते व नेते उपस्थित होते विशेषता लग्नाची चीत व यात्रा असल्यामुळे वेळेत सर्वांनी उपस्थित राहून शांततेच्या मार्गाने हे शक्ती प्रदर्शन घडवून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवावा यासाठी महायुती लक्ष ठेवून आहे असे नमूद करण्यात आले.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button