सातारा:-छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात – श्री.छ.खा.उदयनराजे भोसले.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात – श्री. छ. खा .उदयनराजे भोसले.
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य स्थापन करताना सर्व जाती धर्माचा आदर केला. कधीही त्यांनी भेदभाव केला नाही. त्यांच्या तोफखाना, अंगरक्षक हे इतर सर्व जातींपेक्षाही मुस्लिम बांधव जास्त होते. त्यामुळे देव एकच आहे. फक्त रस्ते वेगवेगळे आहेत. आपल्या सर्वांना एकत्र येऊनच पुढील वाटचाल करायची आहे असे प्रतिपादन श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे केले.
सातारा शहरातील शाही मज्जिद मध्ये शुक्रवारी रमजान ईदच्या निमित्त २४ व्या दिवशी सर्व मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी आले होते. या वेळेला शुभेच्छा देण्यासाठी श्री. छ. खा. उदयनराजे भोसले हे आवर्जून आले होते. त्यांनी या ठिकाणी आपुलकीने मुस्लिम बांधवांची चौकशी केली. तसेच मज्जिद मध्ये जाऊन त्यांनी स्मरण केले. देव सर्वत्र एकत्र असून त्याची पूजा-अर्चा नमाज वेगवेगळ्या असले तरी भक्ती भाऊ व मानव जात एकच आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊनच विकासकामांबाबत तसेच तरुण पिढीला रोजगार देण्यासाठी प्रयत्न करू.
मज्जिद मध्ये तरुण पिढीसाठी वाचनालय तसेच हाज यात्रेकरू साठी केंद्र निर्माण केले पाहिजे. यासाठी प्रयत्न केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. मुस्लिम बांधव हे देशातील एक घटक असून या देशाच्या जडणघडणीमध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. या देशावर त्यांचा ही अधिकार आहे. तो कधी नाकारून चालणार नाही. असे ही त्यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधताना सांगितले.
यावेळी श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांचा शाही मज्जिदचे सन्माननीय इमाम व बांधव यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सुनील काटकर, इर्शाद बागवान, साहिल शेख, नासिर शेख, अल्लाउद्दीन शेख, ॲड ए एम आय मुल्ला, सलीम कच्ची, इकबाल खान, सरफराज बागवान, मोहम्मद शेख, जावेद खान, मरहबा शिकलगार ,साहिल शिकलगार, सलीम बागवान, युनूस शेख महंमद खान, दिलावर पठाण, जमीर शेख, रफिक शेख आय्याज मुल्ला ,शमशुद्दीन शेख, सोहेल बागवान, इम्रान बागवान, रफिक मुल्ला समशेर पठाण, तसेच शाही मशिदीचे सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते .
रमजान ईदच्या २४व्या दिवशी शाही मस्जिद मध्ये मुस्लिम बांधव नमाज अदा करत असल्यामुळे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे भर उन्हात मज्जिदच्या बाहेर उभे राहून इतर मुस्लिम बांधवांशी संवाद साधत होते. या वेळेला अनेकांनी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी सेल्फी काढून छत्रपती शिवाजी महाराजांचे मनमोकळेपणाने संवाद साधला.
छत्रपतींच्या साधेपणाची चुणूक पाहून मुस्लिम बांधव सुद्धा भारावून गेले होते. मनासारखा राजा… राजासारखं मन प्रत्यक्षात अनुभवताना अनेक मुस्लिम बांधवांनी त्यांच्या या आगळ्यावेगळ्या स्वभाव दर्शनाचे कौतुक केले. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर छत्रपतींचे थेट वंशज भेटीस आल्यामुळे अनेक मुस्लिम बांधवांनी त्यांच्या या साध्या भोळ्या स्वभावाचे कौतुक करून त्यांच्याशी सेल्फी काढण्यात धन्यता मानली. राजेंना जवळून पाहून अनेकांनी त्यांना आशीर्वाद दिले तर तरुणांनी त्यांच्याशी हितगुज साधून संवाद साधला. यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक सर्व धर्मातील जमलेल्या लोकांना दिसून आले.