आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

सातारा:-राज्यस्तरीय , पत्रकारांची कार्यशाळा सातारा येथे संपन्न.

सह-संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सह-संपादक अशितोष चव्हाण

RPS STAR NEWS

सातारा:-राज्यस्तरीय पत्रकार पदाधिकारी, पत्रकारांची कार्यशाळा सुपणेकर हॉल सातारा येथे संपन्न.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS STAR NEWS च्या माध्यमातून दि – 31 मार्च 2024 रोजी राज्यस्तरीय पत्रकार पदाधिकारी, पत्रकारांची कार्यशाळा सुपेकर हॉल येथे संपन्न झाली.पत्रकारांच्या कार्यशाळेबद्दल प्राध्यापक दिलीप पुस्तके सर राष्ट्रीय संघटक उपसंपादक यांनी पत्रकारांना मौल्यवान मार्गदर्शन केले. पत्रकारिता करीत असताना पत्रकारांनी किती सतर्क असले पाहिजे, कशा पद्धतीने पत्रकारिता केली पाहिजे, कशा बातम्या बनवल्या पाहिजे, बातम्या बनवत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे या गोष्टीची सविस्तर चर्चा करून विविध उदाहरणे देऊन ते पटवून दिले.पत्रकारिता करीत असताना तुटपुंजा मानधनावरती पत्रकाराला काम करावे लागते. त्यातून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. त्यामुळे इतर व्यवसाय आणि काम करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले पाहिजे. त्याबरोबर आपला पत्रकारितेचा छंद जोपासला पाहिजे. पत्रकारांनी निस्वार्थी काम केले पाहिजे, पत्रकारिता करीत असताना वस्तुस्थिती तपासून पत्रकारिता केली पाहिजे असे सर्व पत्रकार पदाधिकारी यांना आवाहन केले. सध्या गंभीर बनत चाललेल्या लग्नाविषयीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विविध भागातून परराज्यातून मुलींना लग्न करून आणताना मुलीच्या घरी घराकडचे लोक भरपूर पैसा घेतात, लग्न झाल्यानंतर मुलगी आणि त्या मुलीचे पालक कशा पद्धतीने पोबारा करतात. आणि लग्न झालेल्या त्या तरुणाची कशी फसवणूक होते. यासाठी काही उपाययोजना करता येतात का यासाठी त्यांनी मा. प्रल्हाद चव्हाण साहेब राष्ट्रीय अध्यक्ष संपादक यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष संपादक माननीय प्रल्हाद चव्हाण यांच्या मातोश्री श्रीमती प्रेमा चव्हाण यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक करण्यात आले.

माननीय निलेश मोरे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष यांनी मा.प्रल्हाद चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष संपादक यांनी दक्ष पत्रकार संघापासून कशा पद्धतीने संघटना बांधणी करून महाराष्ट्रभर पत्रकार पदाधिकारी यांना एकत्र करून, समाजात घडत असलेल्या अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत अहोरात्र प्रयत्न केले. याविषयी सविस्तर माहिती दिली.

Adv.रजनी गाडे राष्ट्रीय महिला विधी सल्लागार यांनी कायद्याविषयी सविस्तर मौल्यवान मार्गदर्शन केले. पत्रकार पदाधिकारी यांना मार्गदर्शन करत असताना पत्रकार सुरक्षा कायद्याविषयी माहिती देत असताना त्यांनी सांगितले पत्रकार यांनी कुठल्याही चुकीच्या पद्धतीचे काम करू नये.निस्वार्थी स्वच्छ आणि स्पष्ट पत्रकारिता करीत असताना काही कायदेशीर अडचणी आल्या तर त्यास ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS स्टार न्युज च्या माध्यमातून मी स्वतः जातीने लक्ष घालून त्या सोडवीन, संपूर्ण संघटना बरोबर असेल. परंतु आपण जर या गोष्टींचा गैरवापर केला तर त्यास संघटना आणि मी स्वतः जबाबदार असणार नाही आणि मदत केली जाणार नाही. राष्ट्रीय विधी सल्लागार म्हणून मी नेहमी आपल्या सगळ्यांबरोबर असेन अशी त्यांनी ग्वाही दिली.

 मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सर्व पत्रकार प्रतिनिधी आणि पदाधिकारी पदाधिकारी यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.तसेच ज्या पत्रकार प्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना ओळखपत्र आणि नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

प्राध्यापक धीरज सावंत सर राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी छत्रपती शिवरायांचे स्मरण करून विविध गोष्टींवरती चर्चा केली. काळाप्रमाणे होत गेलेला पत्रकारितेच्या माध्यमांमधील बदल ही काळाची गरज आहे. डिजिटल मीडिया हे प्रभावी, काही मिनिटा मध्ये बातम्या प्रसारीत करण्याचे माध्यम आहे. तरी ही प्रसार माध्यमांमध्ये येत असलेल्या नवीन टेक्नॉलॉजी उदा.AI विषय ही त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर माननीय प्रल्हाद चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आपल्यावरती फार मोठी जबाबदारी सोपवली असून ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन अशी ग्वाही दिली. मा. प्रल्हाद चव्हाण यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.

डॉ.विकास खिलारे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांनी समाजात घडत असलेल्या अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार याचा कसा बोलबाला आहे आणि या विरुद्ध लढा देण्यासाठी आपण कशा पद्धतीने काम केले पाहिजे याविषयी त्यांनी मौल्यवान मार्गदर्शन करत आपल्या भूतकाळातील काही गोष्टींवर प्रकाश टाकला. आपले पत्रकार आणि पदाधिकारी हे कट्टर असले पाहिजेत,निर्भीड असले पाहिजेत असे आवाहन सर्व पत्रकार पदाधिकारी यांना केले.भविष्यात बऱ्याच गोष्टींवरती ते लिखाण करणार असल्याचे स्पष्ट केले. लोकशाही कशी धोक्यात आहे त्याला मजबूत करण्यासाठी पत्रकारांनी काय केले पाहिजे अशा विविध गोष्टींवर ती त्यांनी चर्चा केली आणि मौल्यवान मार्गदर्शन केले.हे करत असताना त्यांनी मा.प्रल्हाद चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष संपादक यांचे खंबीर नेतृत्वाचे कौतुक केले.संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळ सातारा याचे अध्यक्ष संस्थापक डॉक्टर विकास खिलारे अशी त्यांची ख्याती आहे. भविष्याविषयी अचूक माहिती सांगणारे असा त्यांचा नावलौकिक आहे.

यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष संपादक मा.प्रल्हाद चव्हाण यांनी सर्व पत्रकार प्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना मौल्यवान मार्गदर्शन केले.त्यांनी ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन च्या माध्यमातून भविष्यामध्ये विविध गोष्टींवर ती केल्या जाणाऱ्या कामांबद्दल, ध्येय आणि उद्दिष्टांबद्दल सविस्तर माहिती दिली. सर्व पत्रकार प्रतिनिधी संघटनेची कशी ताकद आहेत.त्यांची एकनिष्ठता,सर्वांनी ठेवलेला विश्वास विधी सल्लागारांनी दिलेले आश्वासन या सर्वांचे आभार मानले. भविष्यातील ध्येय धोरणांच्या माध्यमातून हजारो लोकांच्या हाताला काम मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यासाठी संघटनेला मिळणारा निधी किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी सांगितले. संघटनेतील पत्रकार पदाधिकारी यांनी दिलेल्या निधीचा भविष्यातील करोडो रुपयांपेक्षाही किती मूल्यवान आहे,महत्त्व आहे हे स्पष्ट केले. हा निधी देणाऱ्या स्थायी सभासदांचे त्यांनी कौतुक केले आणि मनापासून आभार मानले.गाव, तालुका जिल्हा, राज्य आणि राष्ट्र यावर काम करत असताना कशापण पद्धतीने पत्रकार प्रतिनिधींची नेमणूक आणि अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी केलेले नियोजन मार्मिक ठरेल यावर भाष्य केले. सर्व उपस्थित पत्रकार प्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचे आभार मानले.आपल्या पत्रकार प्रतिनिधींची आणि पदाधिकाऱ्यांची व्याप्ती महाराष्ट्र राज्य बाहेरही झालेले आहे असे त्यांनी स्पष्ट केले.पूर्ण देशभरात आपल्या संघटनेची लोक भविष्यामध्ये काम करतील आणि लोकांना न्याय मिळवून देतील अशी आशा व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष यांनी केले.यांनी स्वतः निधी संघटनेसाठी केला याच बरोबर मा.सौ.कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष आणि त्यांचे पती मा.श्री. उमेश भोपी महाराष्ट्र राज्य संघटक यांनी दोघांनी मिळून  निधी ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनला धनादेशाच्या माध्यमातून जाहीर केला याचे कौतुक सर्वांनी केले.मा.श्री. प्रल्हाद चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष संपादक यांनी सर्व निधी देणाऱ्या पत्रकार प्रतिनिधी पदाधिकारी यांचे आभार मानले.

Adv.एकनाथ जाधव महाराष्ट्र राज्य विधी सल्लागार यांनी सगळ्यांचे आभार मानून, सर्व पत्रकार प्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेले सांगून कार्यक्रमाची सांगता केली.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button