आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

येवला:-विठ्ठलाचे कोटमगाव ठरले सुंदर गाव आदर्श पुरस्काराचे मानकरी…..

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS

विठ्ठलाचे कोटमगाव ठरले सुंदर गाव आदर्श पुरस्काराचे मानकरी…..

प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटमगाव बुद्रुक, संपूर्ण जग प्रसिद्ध असलेले ( कोटमगाव विठ्ठलाचे ) ता.येवला, सदर गावाने आर.आर.पाटील सुंदर गाव योजनेत येवला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला असून आज रोजी गाव दहा लाखांच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहे देवळा पं. स. गट विकास अधिकारी वेंद्रे, विस्तार अधिकारी मांडवडे यांच्या सहयोगातील येवला गटविकास अधिकारी,अभिजित पाखरे, अंगणवाडी सुपरवायझर व समितीचे सदस्य , यांनी याबाबत तपासणी केली होती ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबविले, आहे स्वच्छता जलसंधारण दारूबंदी आरोग्य महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गावाने विधायक उपक्रम हाती घेत संपूर्ण तालुक्यात स्वच्छ गाव सुंदर गाव अशी ओळख निर्माण केली आहे.. उत्कृष्ट पारदर्शकता, वृक्षारोपण यात सर्व ग्रामस्थांचा व युवकांचा सहभाग व मोलाचा वाटा आहे हे बक्षीस मिळविण्यासाठी मैलांचा दगड ठरले आहे गावात भूमिगत गटारी करण्यात आली आहेत लोकसभागातून सुमारे 1361 झाडांची लागवड करण्यात आली असून व्यक्तिगत व सार्वजनिक शौचालयाचा नियमित स्वच्छ वापर व स्वच्छता राखण्यात ग्रामपंचायत संपूर्णतःहा अग्रेसर आहेत असे मत, लोकनियुक्त सरपंच श्री. राजेंद्र चिंतामण पाटील काकाळीज यांनी बोलताना सांगितले आहे. सदर गावातील सर्व ग्रामस्थ,ज्येष्ठ नागरिक व युवकांच्या सहभागातून गावाने विकासाच्या दृष्टीने पावले टाकली असून गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ग्रामस्थांचा सकारात्मक सहभाग महत्त्वाचा असून तो मिळत आहे असे मत सरपंच श्री.राजेंद्र चिंतामण पा.काकळीज यांनी यावेळी नमूद केले आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button