पनवेल:-संविधान गौरव दिन उत्साहात साजरा.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS
संविधान गौरव दिन उत्साहात साजरा.
पनवेल :- आज २६ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल विधानसभा मतदारसंघ व दृष्टी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.किशोर देवधेकर सर(कार्याध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मतदारसंघ) यांच्या संकल्पनेतून सालाबाद प्रमाणे, एस.जी.डी पब्लिक स्कूल खांदा कॉलनी, पनवेल,कामोठे, खारघर पोलीस ठाणे येथे संविधान गौरव दिन रँली काढण्यात आली. खांदेश्वर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे, पनवेल शहर पोलीस ठाणे निरीक्षक श्री.नितीन ठाकरे,पनवेल तहसीलदार श्री.विजय पाटील, पनवेल महानगर
पालिका आयुक्त श्री. मंगेश चितळे, पनवेल महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी, पनवेल अग्निशमन विभागाचे फायर सब शेरसिंग गायकवाड, कामोठे पोलीस निरीक्षक यांना संविधान उद्देशिका देऊन उद्देशिकेचे समुह वाचन करण्यात आले. व उपस्थित सर्वांनी संविधानाप्रती निष्ठा राखण्याची शपथ घेतली.
सदर प्रसंगी श्री.किशोर देवधेकर सर (कार्याध्यक्ष-राष्ट्रवादी कॉग्रेस पनवेल विधानसभा मतदारसंघ),श्री.महेशकुमार राऊत (जिल्हाध्यक्ष -पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी सहकारी विभाग, श्री. यशवंत लोखंडे ( जिल्हा कार्याध्यक्ष – असंघटित कामगार विभाग) , श्री. अजिनाथ सावंत (कामोठे शहराध्यक्ष) श्री. अनिल पाटील (खारघर शहराध्यक्ष) समाजसेवक अरुण कांबळे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते नेते सुनील सूर्यवंशी ओबीसी बहुजन समाजाचे नेते बाबासाहेब गर्जे पण अधिकारी हितचिंतक कार्यकर्ते ,सामाजिक कार्यकर्ते उपस्थितीत होते.