चाळीसगाव:-पायोनियर कंपनीच्या बोगस मका बियाण्यामुळे जवळपास 2.5 लक्ष रुपयाचे झाले नुकसान ; भोरस बुद्रुक ( ता.चाळीसगाव ) येथील शेतकरी वसंत कृष्णा पाटील यांचा आरोप व लेखी तक्रार.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
चाळीसगाव:-पायोनियर कंपनीच्या बोगस मका बियाण्यामुळे जवळपास 2.5 लक्ष रुपयाचे झाले नुकसान ; भोरस बुद्रुक ( ता.चाळीसगाव ) येथील शेतकरी वसंत कृष्णा पाटील यांचा आरोप व लेखी तक्रार.
पायोनियर कंपनीच्या बोगस मका बियाण्यामुळे माझे जवळपास 2.5 लक्ष रुपयाचे झाले नुकसान ; भोरस बुद्रुक ( ता.चाळीसगाव ) येथील शेतकरी वसंत कृष्णा पाटील यांचा आरोप व लेखी तक्रार• साडेतीन महिन्याची मक्का असून पूर्णपणे सुकून / वाळून गेली व बहुतांशी तोट्यांना कनिस हे आल नसल्याने , काही कणसांना किरकोळ प्रमाणात दाणे आल्याने , व्यथीत होऊन त्यांनी तालुका कृषी अधिकारी चाळीसगाव , कृषी अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव , चाळीसगाव विधानसभा सदस्य मंगेश दादा चव्हाण यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे. सविस्तर वृत्त असे की , भोरस बुद्रुक येथील बागायतदार शेतकरी वसंत कृष्णा पाटील यांनी कृषिधन कृषी केंद्र , गायत्री कॉम्प्लेक्स , चाळीसगाव येथून 10 बॅग / 40 किलो पी – 3567 पायोनियर कंपनीचे मका बियाणे घेतले होते. संपूर्ण मका बियाण्याची लागवड केली. वेळोवेळी खते , फवारणी केली. विशेष म्हणजे संपूर्ण मक्याला ठिबक आहे. पाण्याची कुठलीही कमतरता नाही.
आज रोजी मक्याचे वय 3.5 / साडेतीन महिने असून मका पूर्णपणे सुकलेला आहे. तोंडी तक्रार केल्याने मध्यंतरी पायनियर कंपनीचे पदाधिकारी स्वप्निल कुलकर्णी कल्याण साबळे सोमवंशी व कन्नड तालुक्यातील एक महिला हे पीक नुकसान पाहणी करून गेले. आम्ही वरिष्ठांना कळवितो , तुम्ही थांबून जा ,कुठेही तक्रार करू नका असे सांगितले. परंतु त्यांनी निव्वळ वेळ मारून येण्याचेच काम केले व कुठलाही प्रतिसाद अथवा प्रत्यक्षात नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे व्यतित होऊन शेतकऱ्यांनी सर्वदूर लेखी तक्रार सादर केली असून नुकसान भरपाई न मिळाल्यास भविष्यात नाईलाजाने आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही , असे तक्रारीत नमूद केले आहे . झालेल्या नुकसान बाबत पायोनियर कंपनी काय निर्णय घेते याकडे चाळीसगाव सह जळगाव जिल्हा भरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.