राहता तालुक्यातील तिसगाव येथिल विविध शासकीय कामांसाठी अडीच कोटी मंजूर होऊन विविध कामांचे उद्घाटन.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
राहता तालुक्यातील तिसगाव येथिल विविध शासकीय कामांसाठी अडीच कोटी मंजूर होऊन विविध कामांचे उद्घाटन.
तिसगाव ग्रामपंचायत च्या तीन वर्षांमध्ये राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील व आदरणीय खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रयत्नांमधून विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून जवळजवळ अडीच कोटी रुपयांचे विकास काम सरपंच सौ आशाताई भास्कर घुले पाटील यांचा पाठपुरावा व कामांचे नियोजन केल्यामुळे गावाला इतका मोठा निधी प्राप्त झाला व अजूनही जवळजवळ 17 प्रस्ताव मंजूर आहे. तेही काम पुढच्या काळात सुरू करण्यात येतील त्याचप्रमाणे तीन वर्ष ग्रामपंचायतचा कारभार चांगला बघितल्या बद्दल कोणताही वाद गावात निर्माण होऊ दिला नाही यशस्वीरित्या वाटचाल सर्व सदस्यांना व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन जो कारभार यशस्वीरित्या पार पाडला त्याबद्दल सरपंच सौ आशाताई भास्कर घुले पाटील व उपसरपंच श्रीमती मीनाताई सुभाष कडू पाटील यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्याच वेळेस सरपंच सौ आशाताई भास्कर घुले पाटील यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांचे सर्व महिला भगिनींचे सर्व बचत गटातील महिलांचे विशेष आभार या ठिकाणी मानले