पंढरीची वारी महाराष्ट्राची समॄध्द परंपरा
प्रतिनिधी :-महेश मोहिते सातारा :- 76205 84904

पंढरीची वारी महाराष्ट्राची समॄध्द परंपरा
पंचक्रोशी दिंडी सोहळा मंडळ नागठाणे तालुका जिल्हा सातारा या मंडळाची आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला असून त्यांचा प्रवास २१दिवसाचा आहे नागठाणे गावातुन वारकरी संप्रदाय मंडळ यांनी टाळ विण्याचा गजर करत ज्ञानेश्वर माऊली च्या नावाचा जयघोष करत मिरवणूक काढुन मार्गस्त होण्यास सुरुवात केली या वारकरी संप्रदाय दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश गोरखनाथ नलवडे.उप अध्यक्ष ह.भ.प.आनंदराव महादेव बागल.तसेच सचिव श्री मोहन बाबुराव राजे.व श्री. चंद्रकांत बाबुराव राजे (फौजी)श्री.बबन जिजाबा मोहिते (मेंबर )श्री.रमेश राजे .यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी सोहळा मार्गस्त होत आहे दिंडी व्यवस्थापक श्री.शशिकांत नलवडे ,श्री दत्तात्रय साळुंखे यांना नागठाणे गावातील ग्रामस्थव परिसरातील लोकांनी भक्तांनी दिंडी सोहळा मार्गस्त होणाऱ्या वारकरी यांना शुभेच्छा दिल्या