मायणी :-(खटाव )-येथे सकल मराठा आंदोलकांचा रास्ता रोको.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
मायणी येथे सकल मराठा आंदोलकांचा रास्ता रोको.
मायणी प्रतिनिधी—मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार व समर्थनार्थ मायणी शहर सकल मराठा समाजाच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता सकल मराठा आंदोलकांनी अकरा ते बारा या वेळेत रास्ता रोको केला. यावेळी बोलताना सकल मराठा मायनी शहर अध्यक्ष डॉक्टर विकास देशमुख यांनी सांगितले की या मराठा समाजाने सहा महिने झाले संघर्ष केला आहे आता आम्ही ओबीसी आहोत याची पुरावे देखील सापडले आहेत म्हणून कुणबी आणि मराठा एकच आहेत असा ठराव सरकारने कॅबिनेट बैठकीत मंजूर करावा तसेच सगळे सगेसोयरे या संदर्भात ज्या हरकती आलेल्या आहेत त्यासंबंधी दोन दिवसात निर्णय घ्यावा असे त्यांनी सांगितले यावेळी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा ,अशा घोषणा देण्यात आला यावेळी अध्यक्षांच्या वतीने मायणी शहर पोलीस निरीक्षक अमोल माने यांना निवेदन देण्यात आले तसेच या निवेदनाची प्रत कलेक्टर प्रांत तहसीलदार यांनाही देण्यात आली. यावेळी गाव कामगार तलाठी गौरव खटावकर, अजित माने, हेमंत जाधव, नवनाथ देशमुख, चंद्रकांत चव्हाण तसेच असंख्य मराठा बांधव उपस्थित होते सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने व त्यांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवला होता (फोटो सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांना निवेदन देताना अध्यक्ष डॉक्टर विकास देशमुख व त्यांचे सर्व सहकारी तसेच तलाठी व पोलीस पाटील दिसत आहेत)