खटाव:-जलसंधारणाची कामे जलद होण्यासाठी नवीन मशनरी खटाव तालुक्यात दाखल.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक /उपसंपादक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक /उपसंपादक
जलसंधारणाची कामे जलद होण्यासाठी नवीन मशनरी खटाव तालुक्यात दाखल.
मायणी प्रतिनिधी__ पाणी फाउंडेशन, सेटरीस, व शिवार सामाजिक संस्था या संस्थेची जलसंधारणाची कामे जलद गतीने होण्यासाठी खटाव तालुक्यातील उद्योजक चैतन्य जोशी, व जितेंद्र शिंदे यांनी नवीन पोकलेन मशीन जिल्हा बँकेच्या अर्थसहाय्यावर खरेदी केली असून हे मशीन नुकतेच तालुक्यातील वरुड येथे दाखल झाले. या मशिनरीचे विधीवत पूजन बाळासाहेब खटावकर व नंदकुमार जोशी यांचे हस्ते झाल्यानंतर या मशिनरीचा शुभारंभ सातारा जिल्हा बँकेचे सिद्धेश्वर कुरोली येथील विकास अधिकारी सुभाष बागल व शाखाधिकारी राजेंद्र काळे तसेच वडूज नगरपंचायतीचे नगरसेवक अभयसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी बँकेचे विकास अधिकारी सुभाष बागल यांनी सांगितले की जिल्हा बँक ही शेतकऱ्यांसोबत व व उद्योजकासोबत असून तरुणांना उद्योग करण्यासाठी आर्थिक बळ देतील आर्थिक बळ देते जेणेकरून नवीन उद्योजक तयार व्हावेत तसेच नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणाऱ्यांची हात तयार व्हावे असा बँकेचा उद्देश आहे त्यासाठी नवीन तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा असे सांगितले पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक जितेंद्र शिंदे यांनी सांगितले की आता नवीन मशनरी आल्याने पाणी फाउंडेशन चे काम वेगात होईल तसेच शेतकऱ्यांना कोणताही आर्थिक फटका बसणार नाही या शुभारंभासाठी पाणी फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक सुखदेव भोसले पांगरखेलचे सरपंच महेंद्र जगताप, शिवार सामाजिक संस्थेचे मिलिंद काटकर, वरुड विकास सोसायटीचे चेअरमन भरत जगदाळे, उपसरपंच सदाशिव माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तू नाना घाडगे , लालासो मोहिते, तुषार इनामदार, भैरवनाथ ट्रस्टचे वसंत आबा माने, अधिक जगदाळे उपस्थित होते शेवटी चैतन्य जोशी यांनी आभार मानले.