वाई:-प्रामाणिक कर्मचारी ही संस्थेची ताकद – प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे ‘किसन वीर’ मधील अधिक्षक रघुनाथ शेलार यांचा सेवागौरव…
पत्रकार वैष्णवी शिंदे:-9146802009

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे
वाई दि.4
प्रामाणिक कर्मचारी ही संस्थेची ताकद – प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे ‘किसन वीर’ मधील अधिक्षक रघुनाथ शेलार यांचा सेवागौरव…
वाईतील जनता शिक्षण संस्थेचा नावलौकिक महाराष्ट्रभर पसरलेला आहे. शिक्षणक्षेत्रात आपल्या वेगळ्या कार्यशैलीने कार्यरत असणारी ही संस्था येथील प्रामाणिक सेवकांमुळेही ओळखली जाते. प्रामाणिकपणे काम करणारे कर्मचारी ही संस्थेची ताकद आहे. अधिक्षक श्री. रघुनाथ शेलार यांनी ही संस्थेची गेली ३३ वर्षे ८ महिने संस्थेमध्ये काम करताना प्रामाणिकपणाचा मार्ग अवलंबिला. संस्थेप्रती व कामाप्रती निष्ठा असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाणे घेता येते. नियतवयानुसार ते निवृत्त होत असले तरी त्यांनी आमच्या हाकेला प्रतिसाद देऊन महाविद्यालयाच्या कामामध्ये सहकार्य करावे. त्यांच्या कार्यकुशलतेचा फायदा नव्या पिढीलाही होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. फगरे यांनी केले. तसेच संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना श्री. शेलार यांनी संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त मा. प्रतापराव भोसले, पदसिद्ध अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष मा. शंकरराव गाढवे, सर्व संचालक मंडळ, सचिव, खजिनदार, प्राचार्य, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी एकूण 12 प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी मनोगत व्यक्त केली.
प्रमोद डेरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ग्रंथपाल डॉ. शिवाजी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. तर बाळासाहेब टेमकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ विभागाकडील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सेवक व शेलार यांचे नातेवाईक उपस्थित होते.