मायणी:-ऐतिहासिक जलपूजनाचे साक्षीदार होणे हे आपले भाग्यच_____आमदार जयकुमार गोरे.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
ऐतिहासिक जलपूजनाचे साक्षीदार होणे हे आपले भाग्यच_____आमदार जयकुमार गोरे.
मायणी प्रतिनिधी—–दुष्काळी भागाचे भवितव्य बदलणारा माण खटावला दुष्काळमुक्त करणारा 1997 पासून प्रलंबित असणारा हे जिहे कटापूर प्रकल्प पूर्णत्वाकडे जातोय या ऐतिहासिक प्रकल्पाचे उद्घाटन विश्वाचे नेते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. तरी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक जल पूजनाचे साक्षीदार व्हा असे आवाहन जयकुमार गोरे यांनी मायणी येथील कार्यकर्ता नियोजन मेळाव्यात
बोलताना केले. आपल्या भाषणात गोरे पुढे म्हणाले की आम्ही घरोघरी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पोहोचणार आहोत तसेच विरोधकांच्या घरी ही पहिली पत्रिका देणार आहोत आणि पाणी पूजनाला चला असे म्हणणार आहोत महिलांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घरोघरी
गुढी उभारण्याचे आवाहन त्यांनी केले प्रारंभी राजू कचरे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित आमचे स्वागत केले. नंतर झालेल्या भाषणात डॉक्टर दिलीपराव. येळगावकर म्हणाले मी 2004 ते 2009 या कालावधीत आमदार होतो पण सरकार विरोधी पक्षाच् असल्याने माझ्या प्रयत्नाला यश आले नाही आमदार जयकुमार गोरे हा लढवय्या माणूस असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्यावर खास मर्जी आहे त्यामुळे खटाव तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे म्हणूनच आम्ही आता एकीने व एक दिलाने काम करत आहोत असे सांगितले या कार्यक्रमास दादा पाटील, मानसिंग देशमुख, जनार्दन देशमुख, सुरज पाटील, जयसिंग शिंदे, हनुमंत जाधव वकील, पिंटू पैलवान, शरद जाधव, गोपाळ पाटोळे, अविनाश पवार, राजेंद्र पवार, सुरज पाटील सोमनाथ भोसले, खटाव तालुका भाजप अध्यक्ष धनंजय चव्हाण तसेच गावचे सरपंच,, सोसायटी चेअरमन, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी मोहन दगडे यांनी आभार मानले.