फलटण:-आधीच लत्करे झालेल्या कार्यकर्त्याचे नावावर बातमी देवून काय साधत आहात.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
आधीच लत्करे झालेल्या कार्यकर्त्याचे नावावर बातमी देवून काय साधत आहात.
फलटण :
परवा झालेल्या श्रीमंत रामराजे यांच्या मेळाव्यातील भाषणावर कोणत्याही वरीष्ठ नेत्यांवर कोणीही न बोलून आमची संस्कृती आम्ही दाखवली आहे पण वाचाळवीर व दीड-दमडीचे किताब देणारे महाशय आमचे नगरसेवक दिड. दमडीचे असते तर तुमच्या श्रीमंत महाराजांनी लोकसभेच्या चर्चेच्या मेळाव्यात त्यांचा उल्लेख केला नसता अशोकराव जाधव व अनुप शहा यांचा उल्लेख केल्या शिवाय तुमची समाचू पूर्ण होत नाही या वरच आमची किंमत काय आहे ते समजावे अशोकराव जाधव चार वेळा व अनुप शहा तीन वेळा नगरसेवक झाले आहेत तुमची लायकी परत त्याच वार्डात उभी रहायची तरीर आहे का हे तपासावे व दुसऱ्याने लिहीलेल्या बातम्याला आपले शीर्षक दयायचे धंदे बंद करा आणि दिवा कुणाचा विसायला लागला आहे. हे स्वतः पहा आशा तिखट शब्दात श्रीमंत रामराजे यांच्या निकटवर्तीय कार्यकत्याचा उद्देशून भारतीय जनता पार्टी फलटण शहर अध्यक्ष नितीन जगताप यांनी समाचार घेतला.
परवा झालेल्या मेळाव्या नंतर मा नगरसेवक अशोकराव जाधव यांनी हा मेळावा म्हणजे फलटणचे वैचारिक अधःपतन आहे अशी टीका केली होती त्याला उत्तर देताना विझणाऱ्या दिव्यांनी फडफड करू नये असे प्रितसिंह खानविलकर यांनी म्हणले होते. लोकसभा जवळ येईल तशी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी दारुगोळा तयार ठेवला आहे त्यामुळे या पुढे ही वाकयुद्ध सुरूच राहील असे वाटते.