सातारा:-बांबू लागवड कार्यशाळा उत्साहात संपन्न.
पत्रकार सुप्रिया पाटसूपे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष:-8459060701

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुप्रिया पाटसूपे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष
बांबू लागवड कार्यशाळा उत्साहात संपन्न.
सातारा प्रतिनिधी – सातारा पंचायत समिती चे माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा बांबू लागवड प्रकल्प लातूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये राबविणेत येत असून प्राथमिक स्वरूपात शेतकरी बांधवांना येणाऱ्या अडी अडचणी आणि यावर असणारे शंका समाधान यावर मा.ज्ञानेश्वर् खिलारी , मुख्य कार्यकारी अधिकारी , सातारा जिल्हा परिषद सातारा यांचे मार्गदशन नुसार श्री.अनिल वाघमारे , गटविकास अधिकारी , सातारा पंचायत समिती सातारा यांनी डॉ.अजय राणे साहेब , सहयोगी अधिष्टाता डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा.रत्नागिरी यांचे बांबू लागवड आणि शंका समाधान आणि शेतकरी बांधव यांचे प्रश्न यावर चर्चा सत्र आयोजित करनेत आले . यावेळी मा.श्री.विजय माईनकर , जिल्हा कृषी अधिकरी , सातारा जिल्हा परिषद सातारा ,मा.श्री.अनिल वाघमारे , गटविकास , सातारा पंचायत समिती सातारा यांनी शास्वत बांबू शेती आणि भविष्यातील संधी यावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच केंद्र शासनाचे आदेशानुसार आजादी का अमृत महोत्सव निमित्त राबविणेत येणाऱ्या विविध उपक्रमा बाबत गटविकास अधिकारी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.संजय यादव , सचिव् ग्रामसेवक संघटना यांनी केले आभार प्रदर्शन डॉ.सत्यजित शिंदे यांनी केले कार्यक्रम आयोजित करणे साठी सातारा पंचायत समिती अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले . शेतकरी बांधव यांनी शंका समाधान मध्ये मोलाचे मार्गदर्शन मिळाले म्हणून आयोजक यांचे आभार मानले.