ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

फलटण:-फलटणच्या रामराजे गट मेळाव्याने भाजप खा. निंबाळकर यांची डोकेदुखी वाढली.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

फलटणच्या रामराजे गट मेळाव्याने भाजप खा. निंबाळकर यांची डोकेदुखी वाढली.

फलटण दि: सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून मेळावे होत आहे. सध्या महायुतीला अनुकूल वातावरण असल्यामुळे उमेदवारांचा उत्साह वाढलेला आहे. परंतु, माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याच फलटण या बालेकिल्ल्यात त्यांना प्रचंड विरोध करण्यासाठी आज मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यामुळे भाजपचे खासदार यांची डोकेदुखी वाढली आहे. हे निश्चित झाले आहे.
वास्तविक पाहता भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी व शिवसेना अशी महायुती असून उमेदवारी अद्यापही जाहीर झालेली नाही. त्यापूर्वीच फलटणमध्ये भाजप खासदार विरोधात बंडाची निशाण फडकवले आहे. राजकारणातील महामेरू व खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांचे पारंपारिक राजकीय विरोधक विधान परिषदेचे माजी अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथे मेळावा झाला. या मेळाव्याला माढा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. एक मुखाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.
या मेळाव्याला माढा मतदारसंघातील आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर ,सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, मनोज पोळ ,सुभाष नरळे, रमेश शिंदे, रमेश धायगुडे, रमेश पाटील, लालासाहेब शिंदे, आबा साळुंखे दत्ता लेंभे ,संदीप मांडवे, प्रा. बंडा गोडसे, बाळासाहेब सोळसकर यांच्यासह सुभद्राराजे नाईक निंबाळकर, बी. के. पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्याला अनेकांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली.राजे शिकारीला बाहेर पडले की शिकार केल्याशिवाय तलवार म्यान्यात ठेवत नव्हते. आता अनेक कार्यकर्त्यांनी विरोधकांना अंगावर घेतले आहे. त्यामुळे आता सेटलमेंट न करता निवडणूक लढवावी लागेल. महायुती हा पहिला पर्याय आहे पण उमेदवारी मिळाली नाही तर वेगळा विचार करावा लागेल. असा गर्भित इशाराही देण्यात आलेला आहे.
या मेळाव्याला मनोगत व्यक्त करताना अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचे माढा खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा नाम उल्लेख टाळून त्यांच्या अहंकारी व हुकूमशाही पद्धतीचा चांगला समाचार घेतला. सर्वांना सत्तेचा त्रास होतोय. अहंकारी प्रवृत्तीचा बीमोड करण्यासाठी रामाने रावणाचा वध केला होता. आज निवडणुकीच्या माध्यमातून अहंकारी राजकीय रावणाला थांबवण्यासाठी राम नाव धारण केलेल्या रामराजेंनी पुढाकार घ्यावा असे स्पष्ट करण्यात आले. या मेळाव्याला पाच ते सात हजार सक्षम कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे महायुती माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करताना कोणती भूमिका घेईल? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
चौकट—- फलटणच्या बाहेरची माहिती नसणारा खासदार झालाय तर सांगलीच्या तुरुंगातील कैदी आमदार झाल्या अशा शब्दात रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर व मान खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर सडकून टीका केलेले आहे असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना खासदाराचे धंदे काय आहेत हे पोचवण्यासाठीच हा मेळावा घेतला आहे असे त्यांनी स्पष्ट केले रणजीत सिंह नाईक निंबाळकर या व्यक्तीशी माझा देणे घेणे नाही तसा माणूस अस्तित्वात नाही कारण या व्यक्तीने पार्लमेंट मध्ये काहीच केले नाही असे त्यांनी गंभीर आरोप केला पश्चिम महाराष्ट्रात पाणी देण्यासाठी मी केलेला प्रयत्न सर्वांना ठाऊक आहे त्यामुळे संजू राज्यांना जर माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली नाही तर यांनाही ती मिळवून देणार नाही अशीही गर्जना रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केली.
——————————
फोटो -फलटण येथे झालेल्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना रामराजे नाईक निंबाळकर व मंचकावर उपोषण असलेले मान्यवर (छाया- अजित जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button