खटाव:-मायणी येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाची कार्यशाळा संपन्न.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
मायणी येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाची कार्यशाळा संपन्न.
मायणी :प्रतिनिधी
मायणी ता .खटाव येथे रविवार दि.२१जानेवारी २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.डॉ.संतोष बजाज सर यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.डॉ.विश्वदीप आपगे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री.अमरदीप आपगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मायणी ता.खटाव येथील मायणी अभयारण्य सभागृहात कार्यशाळा संपन्न झाली. प्रारंभी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यशाळेच्या कार्यक्रमामध्ये नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांना मानवाधिकार कार्य क्षेत्रामध्ये कोणकोणत्या प्रकारे कामे केली जातात.सर्वसामान्य जनतेला न्याय कसा मिळवून दिला पाहिजे.तसेच मानवाधिकार विषयी,प्रचार, प्रसार कशा प्रकारे केला पाहिजे याचे विशेष प्रशिक्षण दिले.भविष्यामध्ये नवनवीन उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या कार्यशाळेचे आयोजन आय.एच.आर. एस.जे.सी चे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ.संतोष डांगे यांनी केले.प्रमुख मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यशाळेच्या कार्यक्रमाला डॉ.संजय गिरीबुवा सचिव महाराष्ट्र राज्य,डॉ.संदीप राजे सल्लागार महाराष्ट्र राज्य,श्री. विष्णू इंगळे पश्चिम महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक उपाध्यक्ष,
श्री.बाबासाहेब कुंभार, पश्चिम महाराष्ट्र सचिव, श्री.के.एम.पाटील पश्चिम महाराष्ट्र मुख्य महासचिव, श्री.रुपेश पुंडेकर पश्चिम महाराष्ट्र राज्य सल्लागार, सौ.रुपाली जगदाळे पश्चिम महाराष्ट्र महिला सल्लागार,
श्री.अतुल निकाळजे मुंबई कल्याण मुख्य सचिव,सौ. रुपाली माळी सातारा जिल्हा महिला अध्यक्ष,श्री.राजाराम जाधव सातारा जिल्हा उपाध्यक्ष,अमोल माळी सातारा जिल्हा उपाध्यक्ष ,
श्री.सुहास पिसाळ सातारा जिल्हा मुख्य वाद निवारण अधिकारी,श्री.प्रशांत रत्नपारखी सातारा जिल्हा सचिव ,श्री.अमोल इंगळे सातारा जिल्हा डी.आर.ओ,
श्री.बाबासाहेब थोरवे सातारा जिल्हा सल्लागार,
श्री.अण्णा जाधव सातारा जिल्हा सल्लागार,श्री. अभिजित देशमुख सांगली जिल्हाध्यक्ष,श्री.योगेश सुतार सांगली जिल्हा मुख्य उपाध्यक्ष,नितीन चन्ने सांगली जिल्हा सल्लागार,रामचंद्र सरगर सोलापूर जिल्हा जनसंपर्क प्रमुख,श्री.प्रदीप देशमुख खटाव तालुकाध्यक्ष,
श्री.विशाल तेली कराड तालुका सरचिटणीस,
डॉ.श्री.तानाजी कोळेकर,खटाव तालुका सचिव,श्री.अनिल काळे कराड तालुका डीआरओ,विशाल चव्हाण बहिष्कृत चळवळ साप्ताहिकाचे संपादक आदी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेस सातारा, सांगली,सोलापूर जिल्ह्यातून पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संतोष डांगे यांनी केले.तर
सर्व उपस्थितांचे आभार अमरदीप आपगे यांनी मानले.