मायणी:-वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेत क्रीडामहोत्सव उत्साहात संपन्न.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS

वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेत क्रीडामहोत्सव उत्साहात संपन्न.
सन२०२४.२५ या शैक्षणिक वर्षातील क्रीडामहोत्सवास गुरुवार दि.२६.१२.२०२४ व शुक्रवार दि.२७.१२.२०२४रोजी च्या नियोजनानुसार आज सकाळी ११ वाजता संस्थेचे विद्यमान संचालक मा.श्री.पिटके डी.आर्.सर यांच्या उपस्थितीत व त्यांच्या हस्ते उद्घाटन करुन सुरुवात केली
आपल्या मनोगतात मा.श्री.पिटके सरांनी प्रशालेचा खेळातील यशाचा चढता आलेख पाहून आनंद व्यक्त करून आजच्या वीर बाल दिनानिमित्त विद्यार्थिनींना उदबोधित केले….
सदर क्रीडामहोत्सवाचे औचित्य साधून आताच पार पडलेल्या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रशालेची विद्यार्थिंनी कु.संतोषी विकास देशमुख हिचा यथोचित सत्कार करण्यात आले…..
या कार्यक्रमास प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.येवले(गुदगे)व्ही.व्ही.मॅडम,क्रीडा विभाग प्रमुख श्री.एस्.एस्.पवार सर,प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर वृंद,विद्यार्थिनी उपस्थित होते……
सदर क्रीडामहोत्सवास संस्थेचे विद्यमान चेअरमन मा.श्री.सुरेंद्र(दादा)गुदगे,संस्थापक सचिव मा.श्री.एस.डी.कुबेर सर,सर्व संचालक, खटाव तालुक्यातील क्रीडा विभाग पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.




