खटाव-(चोराडे):-ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन व RPS स्टार न्युज चा बुकलेट अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन व RPS स्टार न्युज चा बुकलेट अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
दि.24 जानेवारी रोजी मौजे चोराडे ता. खटाव येथे आरपीएस स्टार न्युज व ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रल्हाद चव्हाण तसेच असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य विधी सल्लागार Adv. एकनाथजी जाधव व असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रमोद देवाडिगा व प्राध्यापक नितीन भोसले सर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुकलेट अनावरण सोहळा संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना Adv.एकनाथ जाधव यांनी पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशी ग्वाही दिली व संघटनेच्या वाढीसाठी कायमस्वरूपी योग्य ते मार्गदर्शन करू व संघटनेच्या वाढीसाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले.
तसेच राष्ट्रीय अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी पत्रकारांना योग्य ते मार्गदर्शन केले व संघटना शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रमांना पुढील काळात प्राधान्य देणार असून सर्व पत्रकारांनी एकजुटीने समाजाच्या हितासाठी कार्य केले पाहिजे असेही ते बोलताना म्हणाले.
तसेच संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रमोद देवाडिगा यांनी संघटना वाढीसाठी युद्धपातळीवर काम केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच मौजे चोराडे गावचे पत्रकार अनमोल गुरव यांनी ग्रामीण भागामध्ये अन्यायाविरुद्ध लढा उठवत समाजाची कामे केली त्याबद्दल त्यांना देखील गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार सौरभ चव्हाण यांनी केली.
यावेळी RPS स्टार न्युज चे सातारा जिल्हाध्यक्ष मा. विनोद पाटील सर व पत्रकार शरीफ पटेल,विशाल पिसाळ,आकाश जाधव,अक्षय अवघडे,मुन्ना पटेल आदी उपस्थित होते.