आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-आराध्य प्रभू श्रीराम मंदिराचे 22 जानेवारी 2024 रोजी भव्य लोकार्पण व प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापानेचे औचित्य साधून युवकांनी धर्मपुरि घाट, वाई येथे स्वच्छता अभियान आणि हजारो दिवे प्रज्वलित करून “प्रभू श्री राम मंदिराची आरास” साकारली.

सह - संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सह – संपादक अशितोष चव्हाण

वाई:-आराध्य प्रभू श्रीराम मंदिराचे 22 जानेवारी 2024 रोजी भव्य लोकार्पण व प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापानेचे औचित्य साधून युवकांनी धर्मपुरि घाट, वाई येथे स्वच्छता अभियान आणि हजारो दिवे प्रज्वलित करून “प्रभू श्री राम मंदिराची आरास” साकारली.

आपल्या सर्वांचे आराध्य प्रभू श्रीराम मंदिराचे काल दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी भव्य लोकार्पण व प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. त्याचेच अवचीत्य साधून वाई येथील सांस्कृतिक, सामाजिक आणि नैसर्गिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अर्पण समूहाने आणि धर्मपूरि घाट संस्थान युवकांनी आपल्या कार्याचा ठसा पुन्हा एकदा वाई नगरीमध्ये उमटवला आहे.
आपल्या सर्वांचे आराध्य प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे काल आयोध्या येथे भव्य लोकार्पण व प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. त्याचेच अवचीत्य साधून युवकांनी धर्मपुरि घाट, वाई येथे स्वच्छता अभियान राबवले आणि हजारो दिवे प्रज्वलित करून “प्रभू श्री राम मंदिराची आरास” साकारली.
कालचा दिवस हा भारतीय संस्कृतीमध्ये धार्मिक, सामाजिक आणि पारंपरिक महत्व प्राप्त झालेला दिवस. काल ५०० वर्षांनंतर प्रभू श्री रामाचे आयोध्या नगरीमध्ये आगमन झाले. म्हणूनच दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई शहरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वाई नगरी मधील सर्व ढोल पथकांनी मिळून तब्बल ३०० ढोल – ताशांच्या गजरात किसनवीर चौक, वाई येथे जल्लोष साजरा केला. याच जल्लोषात युवकांनी धर्मपुरी घाट, वाई येथे हजारो दिव्यांच्या मदतीने श्री राम मंदिराची भव्य आरास साकारत समस्त वाईकरांना भुरळ पाडली. या वेळी घाटावर जमलेल्या इतर वाईकरांनी युवकांना आनंदाने सोबत केली. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. या वेळी श्री मयूर घार्गे यांनी घाट स्वच्छता कामी पाणी टँकर उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची पहिली पणती श्री मयूर घार्गे यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. या वेळी धर्मपुरी घाट संस्थान, प्रतिष्ठान
आणि अर्पण ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. या वेळी पंकज खागे, निखिल कारळे, भूषण मिस्त्री, मृणाल गव्हाणे, नेहा जायकर, हर्षदा यादव, वैष्णवी जाधव, मानसी बावसकर ,तेजस पंडित, प्रतीक सरकाळे, जय सकुंडे, अथर्व पोरे, मुनवा यादव, श्रीपाद माने, ओंकार शिंदे, शिवराज यादव, धनश्री पुदाले, राकेश पुदाले, शिवांश पुदाले, साहिल देशमाने, आदिराज घार्गे , राही घार्गे उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button