ताज्या घडामोडी

कोल्हापूर:-सौ. माधुरी शिंदे-जाधव यांना राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

सौ. माधुरी शिंदे-जाधव यांना राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान.

कोल्हापूर:- सौ माधुरी सुर्यकांत शिंदे-जाधव यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय साहित्यपरिषद कोल्हापूर, व न्युज गंगाधर आयोजित संस्थेच्या वतीने कोल्हापूर राष्ट्रीय संवाद परिषद कार्यक्रमात श्रीफळ शाल मानाचा कोल्हापुरी फेटा व सन्मान गौरवपत्र देऊन सत्कार शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधील कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
जिल्हा परिषद शाळा उंब्रज (मुले) ता कराड जि सातारा येथील कार्यकुशल, विद्यार्थी प्रिय, आदर्श शिक्षिका,तंत्र स्नेही ,उपक्रमशील व प्रयोगशील, साहित्यिक ,शिक्षणतज्ञ,प्राथमिक शिक्षिका सौ माधुरी सुर्यकांत शिंदे-जाधव यांनी शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी वर्ग व शाळा स्तरावर डिजिटल एज्युकेशन, कृती युक्त शिक्षण, खेळातून आनंददायी पध्दतीने शिक्षण या विविध माध्यमांतून १००% विद्यार्थी यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शैक्षणिक मार्गदर्शन केले आहे.शैक्षणिक परिषदामधून तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत.विज्ञान, गणित व इंग्रजी विषयाच्या संदर्भात विद्यार्थी केंद्रित पध्दतीने शिक्षण देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत.
या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन कोल्हापूर येथील राष्ट्रीय साहित्य परिषद कोल्हापूर,न्युज गंगाधर आयोजित यांनी सौ माधुरी सुर्यकांत शिंदे-जाधव यांना राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सौ माधुरी सुर्यकांत शिंदे-जाधव यांना राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल उंब्रज ग्रामपंचायतीचे सरपंच योगराज जाधव, उपसरपंच सुनंदाताई जाधव, मुख्याध्यापक पद्मा भुते,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक माने, केंद्रप्रमुख सुनंदा पाटील,कराड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी संमती देशमाने, कराड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे , प्राथमिक शिक्षण जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजावर,महाराष्ट्र राज्य एकता क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व अखिल भारतीय उध्दव दमयंती मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष अनिलकुमार कदम, मराठी मासिक दमयंती संपादिका सौ कल्पना कदम, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमन सौ निशा मुळीक,प्रा सुहास मोहिते अधिकारी, पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button