आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-सौ.अनिता गोरे नवोपक्रम स्पर्धेमध्ये जिल्ह्यात प्रथम.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सौ.अनिता गोरे नवोपक्रम स्पर्धेमध्ये जिल्ह्यात प्रथम.

 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सन
2023-2024 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये वाई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अभेपुरी येथील आदर्श व शिष्यवृत्ती तज्ञ मार्गदर्शक शिक्षिका सौ.अनिता गोरखनाथ गोरे (मॅडम)यांच्या
समजून आनंदाने वाचूया,
गुणवत्तेच्या शिखरावर पोहचूया.
या नवोपक्रमाचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला असून,सध्या सोशल मीडियाच्या युगात विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उदात्त हेतूने त्या सेवेत रुजू झाल्यापासूनच कार्य करत आहेत. यावर्षी त्यांनी नवोपक्रम स्पर्धेत सहभाग घेतला आणि तो निश्चितच प्रेरणादायी असल्यामुळे सर्वांना आवडला व जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला.

वर्गामध्ये घेतलेल्या नवोपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे शाळेतील विद्यार्थी यांची वाई येथील विश्वकोश कार्यालयास भेट, लोकमान्य टिळक ग्रंथालय वाई येथे भेट, श्यामची आई या पुस्तकाचे क्रमशः वाचन,शब्दावरून गोष्ट तयार करणे, प्रसंगावरून संवाद तयार करणे, लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला, वृत्त निवेदिका विद्यार्थ्यांच्या भेटीला, निपूण वाचनहंडी, अभिवाचन त्याचप्रमाणे गटशिक्षणाधिकारी श्री.महामुनी साहेब यांचा ई-बुक ऑडिओ क्लिप इत्यादी उपक्रमांचा समावेश होता.
पुस्तक वाचल्याने चांगले विचार व चांगले संस्कार विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वर्गातील पुस्तका बरोबरच इतर पुस्तकांचे वाचन केल्यास, तसेच निरनिराळ्या वाचनालयास किंवा लेखकांच्या भेटी घेतल्यास त्यातून त्यांच्यात वाचनाची प्रेरणा निर्माण होईल व प्रत्येक विद्यार्थी हा कोणतेही पुस्तक समजून,उमजून आनंदाने वाचन करेल व तो निश्चितच गुणवत्तेच्या शिखरावर पोहचेल असे मत सौ.अनिता गोरे मॅडम यांनी व्यक्त केले. या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या
यशस्वीतेबद्दल वाई पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. सुधीर महामुनी साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.विष्णू मेमाने साहेब,श्री.साईनाथ वाळेकर साहेब, केंद्रप्रमुख सौ.निर्मला भांगरे मॅडम, मुख्याध्यापक श्री.सुरेश नायकवडी सर, शाळेतील सर्व शिक्षक वर्ग,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मांढरे सर इत्यादींनी त्यांचे कौतुक केले. या नावीन्यपूर्ण उपक्रमा वेळी विद्यार्थ्यांच्या पर्यंत लेखक उपलब्ध करून देणे,अथवा विविध ठिकाणी भेटी देणे यासाठी बापूसाहेब शिंदे माध्यमिक हायस्कूल चिखलीचे मुख्याध्यापक त्यांचे पती श्री.गोरखनाथ महादेव गोरे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाची चर्चा होत आहे. उपक्रमाच्या यशस्वी बद्दल त्यांचे अभेपुरी येथील ग्रामस्थ, शिक्षक वर्ग, व जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button