मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
प्रतिनिधी:-कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042
लोहगाव( वार्ताहर) राहता तालुक्यातील प्रवरा परिसरातील प्रेस क्लब प्रवरेची पहिली बैठक नुकतीच तिसगाव प्रवरा येथे तिसगाव फाटा येथील मोठेबाबा मंदिरात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संजय कोळसे हे होते. प्रेस क्लब प्रवरेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम तसेच प्रेस क्लबच्या वतीने पुरस्कार देण्याचे यावेळी बैठकीत संपन्न झाले.
यावेळी पुरस्कार वितरण समितीची ही स्थापना या बैठकीत करण्यात आली. यावेळी प्रेस क्लब प्रवरेचे अध्यक्ष विजय बोडखे. उपाध्यक्ष प्रमोद कुंभकर्ण. ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक रवींद्र काकडे .डॉक्टर प्राध्यापक अनिल बेंद्रे .प्रसिद्धीप्रमुख कोंडीराम नेहे .सचिव सुभाष कोंडेकर. प्रकाश औताडे .चंद्रशेखर जगताप .कैलास विखे .साईप्रसाद कुंभकर्ण .सुनील कालेकर, देशमुख.आदी या प्रसंगी उपस्थित होते.