आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-एन.एस.एस.मधून विद्यार्थी घडतात मा. वैभव पवार.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

वाई दि.09
एन.एस.एस. मधून विद्यार्थी घडतात मा. वैभव पवार.

 

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व समजते. मुलांबरोबर मुलीही यात सहभाग घेऊन श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देतात. एन.एस.एस. मधून विद्यार्थी घडतात असे प्रतिपादन नायब तहसिलदार मा. वैभव पवार यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. भानुदास आगेडकर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. याप्रसंगी सरपंच रेखा जगताप, एन.एस.एसचे सल्लागार डॉ. चंद्रकांत कांबळे ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, मुख्याध्यापक संजय कुंभार, प्रमोद डेरे, कॅ.डॉ. समीर पवार, डॉ. शिवाजी कांबळे यांची उपस्थिती होती.
मा. पवार म्हणाले, या शिबिरामध्ये विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आजच्या या रणरागिणी मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात हे या शिबिरात त्या दाखवून देतील. विद्यार्थ्यांनी गावात विधायक काम करावे. ग्रामीण जीवन जाणून घ्यावे.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. आगेडकर म्हणाले आमचे विद्यार्थी गावकऱ्यांच्या सादाला प्रतिसाद देतील, शेंदुरजणे हे गाव सधन आहे. गावाला उज्ज्वल परंपरा आहे. विद्यार्थ्यांनी गावातील लोकांशी सुसंवाद साधवा.
डॉ. चंद्रकांत कांबळे, ग्रामस्थ सुरेश जगताप व संजय जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्ताविक केले. सुमती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबादास सकट यांनी आभार मानले. कार्यक्रमास रामदास सूर्यवंशी, डॉ. प्रेमा यादव, संतोष मुळीक, चेतन तावरे, सुनील दगडे व एन.एस.एस.चे स्वयंसेवक यांची उपस्थिती होती.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button