ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-अभिनेते किरण माने यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात जाहीर प्रवेश.

पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
अभिनेते किरण माने यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात जाहीर प्रवेश.

सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर जाहीरपणे रोखठोक भूमिका घेणारे अभिनेते किरण माने यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्रीवर पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या या सोहळ्याला सुषमा अंधारे, सुनील प्रभू यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी किरण माने आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांशी संवादही साधला. किरण माने यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हणत संवाद साधायला सुरुवात केली. त्यावेळी समोरून शिवसैनिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद आला नाही. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी स्वत: पुढाकार घेत, ‘अरे म्हणा की जय महाराष्ट्र’, असे सांगितले. त्यावर शिवसैनिक एका सुरात ‘जय महाराष्ट्र’उद्गारले आणि पुढील भाषणाला सुरुवात झाली.
किरण माने यांनी यावेळी शिवसेना (ठाकरे गट) पक्षात प्रवेश करण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली. मी एका सर्वसामान्य घरातील व्यक्ती आहे. मी परिवर्तनाच्या चळवळीत होतो आणि राहील. मी संविधान वाचवण्यासाठी लढत आहे. आज राज्यातील आणि देशातील वातावरण गढूळ झाले आहे. भारतीय संविधान धोक्यात आहे, अशावेळी त्याविरोधात लढणारा एकमेव नेता म्हणजे उद्धव ठाकरे हाच आहे. त्यामुळे या लढाईत त्यांच्या पाठिशी उभं राहणं महत्त्वाचं आहे. अनेकांना मी अचानक राजकीय भूमिका कशी काय घेतली, याचं आश्चर्य वाटेल. मात्र, मी पूर्ण विचार करुन हा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांची वैचारिक नाळ ही प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी जोडली गेली आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आल्यास प्रजेचे हाल कुत्रं खाणार नाही, असे प्रबोधनकारांनी लिहून ठेवले आहे. आज तशीच काहीशी परिस्थिती आहे. त्यामुळे एक सजग नागरिक म्हणून आपण सक्रियपणे राजकारणात उतरले पाहिजे, असे मला वाटले. त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना पक्ष देईल ती जबाबदारी मी मनापासून पार पाडेन, असे किरण माने यांनी म्हटले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी किरण माने यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांना पक्षात प्रवेश दिला. किरण माने हे राजकीय हेतूने नव्हे तर चाललेलं पाहवत नाही म्हणून शिवसेना पक्षात आले आहेत. मी तुम्हाला एवढंच वचन देतो की, तुम्ही शिवसेनेत आलात, याचा पश्चाताप तुम्हाला होणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button