ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-सातारा खासदारकीसाठी शिवसेनेचे युवा नेते विकास शिंदेंच्या नावाची चर्चा…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

सातारा खासदारकीसाठी शिवसेनेचे युवा नेते विकास शिंदेंच्या नावाची चर्चा…

वाई दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून अद्यापही जागा वाटपाचा फॉर्मुला जाहीर झालेला नाही. त्यामुळे सध्या राजकीय वेट अँड वॉच जरी दिसत असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने आगामी लोकसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची केली जात आहे. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी नवीन चेहरा व सामान्य शिवसैनिकाला संधी घेण्याची मानसिकता शिंदे गटातील शिवसैनिकांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे ४५ वर्ष राजकारणामध्ये आपली शिंदेशाही प्रस्थापित करणाऱ्या शिंदे कुटुंबातील नव पिढीचा तरुण चेहरा म्हणून विकास शिंदे यांच्या नावाची नव्याने चर्चा सुरू झालेली आहे.
तसं पाहता सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये अनेकांनी आपली राजकीय इच्छाशक्ती बोलून दाखवलेली आहे. सातारा जिल्हा व येथील मतदार हे देश पातळीवरील राजकारणापेक्षा साताऱ्यातील घडामोडी बाबत मतदान करताना विचार करतात. त्यामुळे अनेकदा प्रमुख राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना म्हणजेच सत्ताधाऱ्यांना घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे बहुदा सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये सत्ताधारी महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातो. त्या अनुषंगाने उमेदवार निवड करताना फारशी अभ्यासूवृत्ती अनुभव व अर्थकारण याची तपासणी न करता सामान्य कुटुंबातील व्यक्ती सुद्धा खासदार होऊ शकतो ? याच निकषावर सध्या युवा नेते विकास शिंदे यांचे नाव नव्याने चर्चिले जात आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी सहा विधानसभा मतदारसंघ येत आहेत. काही वर्षांपूर्वी साधारण सातारा जिल्ह्यातील पाच जागा राष्ट्रवादी , काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एक आमदार निवडून आले होते. आता परिस्थिती संपूर्णपणे बदललेली असून सातारा जिल्ह्यात राजकीय अस्थिरता पाहण्यास मिळत आहे. भाजपच्या वतीने माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील व राज्यसभा सदस्य खासदार श्री चे उदयनराजे भोसले यांचे नाव भाजपच्या वतीने घेतले जात आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातील महायुतीमध्ये सातारची जागा ही प्रतिष्ठेची केल्यामुळे या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित दादा पवार गटाचे नितीन पाटील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वतीने आता युवा नेते विकास शिंदे यांचेही नाव पुढे आल्याने महायुतीमधील अंतर्गत कुरघोडी सौम्य प्रमाणात का होईना पण समोर आलेली आहे. युवा नेते विकास शिंदे यांनी आतापर्यंत श्री छ खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून आपली संपूर्ण जिल्ह्यात ओळख निर्माण केली होती. पण आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक म्हणून ओळखले जात आहेत. हा सत्तेचा करिष्मा मानला जात आहे.
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या गटातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला लोकसभेत संधी देण्यासाठी किमान महाराष्ट्रातील दहा जागा लढवणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळेच तर सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून इतर उमेदवारांनी दावा केला आहे .आता युवा नेते विकास शिंदे यांचे ही नाव सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक पुढे आणत आहेत.
सर्वसामान्य शिवसैनिक व महायुतीचे समर्थन यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती उमेदवार विजयी होणार असे भाकीत केले जात आहे. सध्या राजकारणामध्ये नेमकं कोणाला उमेदवारी मिळेल ? हे सांगणे कठीण असले तरी फार काही अवघड नाही. कारण, सातारा जिल्ह्याचा दहा वर्षाचा इतिहास जर पाहिला तर या दहा वर्षाच्या पाठीमागे खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांनी आपल्या पक्षातून उमेदवारी घ्यावी यासाठी राजकीय पक्षाचे नेते पाय घड्या घालत होते. पण, सध्याच्या परिस्थितीमध्ये दुधाने तोंड भाजले की ताक सुद्धा फुकून पिल्या जाते अशी परिस्थिती ओढवलेली आहे .
तसं पाहिलं तर
महायुती मधील भाजप पक्षाचा जर विचार केला तर देशपातळीवर भाजपचा गौरव आहे. हे नाकारून चालणार नाही. पण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गट व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना यांचेही प्राबल्य निर्माण झालेले आहे. शेवटी विजय होणाऱ्या उमेदवाराला निवडून देणे क्रमप्राप्त आहे. यासाठीच राजकीय पक्षाला बांधणी करावी लागणार आहे.
त्याकाळी भाजपचे उमेदवार असलेले नरेंद्र पाटील यांनी श्री छ उदयनराजे भोसले यांची दहशत मोडीत काढीन . सातारा जिल्ह्यातील वाहन चालकांना टोल मुक्त प्रवास करता येईल. जिल्ह्यातील पाणी प्रश्न सोडविले असे तीन प्रमुख प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासनाची पूर्तता झाली नाही त्यामुळे पुन्हा नवीन वचननामा किंवा जाहीरनामा म्हणजे एक प्रकारे दिशाभूलच आहे. हे मतदारांना पटत आहे का नाही याचीच आता परीक्षा द्यावी लागणार आहे. विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील हे प्रशासकीय अभ्यासू व्यक्तिमत्व व संसदेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करणारे खासदार आहेत पण त्यांना आता वयाचे बंधन येऊ लागलेले आहे.
सध्या शिवसेनेचे युवा नेते विकास शिंदे हे सामान्य शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना पक्षाने आदेश दिला तर खासदारकीची निवडणूक लढवू शकतो. असे जाहीर केले नसले तरी त्यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. यापूर्वी वाई मतदार संघातून त्यांनी दोन आमदार निवडून देण्याचे परिश्रम घेतलेले आहेत. त्यांच्या घराण्यात पंधरा वर्षे जिल्हा परिषद सदस्य, दहा वर्षे पंचायत समिती सदस्य, वाई पंचायत समिती सभापती अशा अनेक पद मिळवून दाखवलेले आहेत. काही वर्ष वाई तालुक्यामध्ये विकास शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांनी आपली राजकीय उंची प्राप्त केली आहे. जर त्यांना खासदारकीची उमेदवारी मिळाली तर सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती सुद्धा सातारा लोकसभा मतदारसंघात विकास करू शकतो. हे सिद्ध करण्याची ते जबाबदारी पेलतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सध्या शिवसेनेच्या कार्यपद्धतीने सामान्य माणसांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. महायुती माध्यमातून वाटाघाटी करून शिवसेना पक्षाला अधिकृत महायुतीची उमेदवारी मिळावी. यासाठी शिवसेनेचे माऊली शेलार, पुरुषोत्तम जाधव, शारदाताई जाधव, रवींद्र भिलारे, निलेश मोरे, एकनाथ ओंबळे, विजय भिलारे, अक्षय मोहिते, तुकाराम तुपे, वनीता जाधव, संजय शेलार, चंद्रकांत जाधव व विकास शिंदे,संपर्कप्रमुख शरद कणसे व लोकसभा समन्वयक विजय बापू शिवतारे हे आशावादी आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी महायुतीने शिवसेना दिल्यास नक्कीच या ठिकाणी हा धनुष्यबाण महायुतीच्या एकसंघ ताकदीवर पेलतील. असा विश्वास शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेला आहे.

———————&&————————–
फोटो —
शिवसेना युवा नेते विकास शिंदे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button