आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लोहगाव:-मराठीची अस्मिता बाळगून तिचे संवर्धन करावे -मते
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
लोहगाव(वार्ताहर):- मराठी भाषा ही साहित्याची खाण असून मराठीतून अलौकिक भाषा सौंदर्य फुलविले जाते. मराठीचा वारसा हा आपल्या घराण्यात पिढीजात असून शुद्ध आणि स्पष्ट मराठी बोलणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्रत्येक मराठी भाषकांनी मराठीची अस्मिता बाळगून तिचे संवर्धन करावे, असे प्रतिपादन अहमदनगर आकाशवाणीचे निवेदक संतोष मते यांनी केले.
प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोपाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य नानासाहेब शेळके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर आकाशवाणीचे निवेदक, प्रसिद्ध सूत्रसंचालक संतोष मते व प्रसिद्ध चित्रकार रवी भागवत हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व पाहुण्यांचा परिचय डॉ. शरद दुधाट यांनी करून दिला. यावेळी प्रियंका दळे या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. रवी भागवत यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचे महत्व सांगत तिचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. तर संतोष मते यांनी आपल्या भाषणातून मराठीची महती सांगत निवेदन आणि सूत्रसंचालन ही नवी क्षेत्रे विद्यार्थ्यांना खुणावत असल्याचे सांगितले. प्राचार्य नानासाहेब शेळके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मराठी भाषेला शेकडो वर्षांची परंपरा असून अनेक धार्मिक ग्रंथ ही मराठीची देण असल्याचे सांगितले. याप्रसंगी अमृत महोत्सवी विविध स्पर्धा व पंधरवडा काळातील विविध स्पर्धांच्या प्रमाणपत्राचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा ठोकळ यांनी केले तर शेवटी हिरा चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.