फलटण:-गिरवी परिसरातील बेंदूर सण पारंपारिक पद्धतीने साजरा.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
गिरवी परिसरातील बेंदूर सण पारंपारिक पद्धतीने साजरा.
गिरवी (फलटण) :- फलटण तालुक्यातील गिरवी परिसरातील गिरवी धुमाळवाडी बोडकेवाडी जाधववाडा निरगुडी विंचुर्णी मांडवखडक दरेवाडी दालवडी ताथवडा उपळवे वेळोशी सावंतवाडी दुधेबावी जावली आंदरुड वाखरी ढवळ या विविध ग्रामीण भागातील गावागावांतून शेतकऱ्यांचा मित्र बैल यांची सकाळ पासून अंगोळ घालून रंगीबेरंगी बेगडी शिंगाला लावून आकर्षक सौंदर्यासाठी झुली बैलांच्या अंगावर चढवून घरातील सुवासिनी स्त्रिया यांनी हळद कुंकू लावून पुजा पुरण पोळीसह नैवेद्य दाखवून नंतर वाजतगाजत मिरवणूकीने गावातील बाजार मैदानात प्राचीन ऐतिहासिक धार्मिक आध्यात्मिक परंपरा असलेल्या मारुती मंदिरात दर्शनासाठी बैल घेऊन येतात.मिरवणूक काढून बैलांच्या जोड्या गुलालाची उधळण करत ढोल ताशा झांज पथक हलगी वादक बेंजो वाजवत शेतकरी हौसेने ग्रामप्रदिक्षणा करत ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर, महादेव मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर गोपाळकृष्ण मंदिर अशा पध्दतीने उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गावात बेंदूर सण उत्सव वेगवेगळ्या पध्दतीने जल्लोषात आनंदात साजरा करण्यात आला.
काळाच्या ओघात अनेक ग्रामीण प्रथा परंपरा रुढी चालीरीती संस्कृती नष्ट होत असल्याबद्दल गिरवी गावातील वयोवृद्ध बैल मालक यांनी खंत व्यक्त केली.बेंदूर सणाच्या दिवशी लेझीम, गजी नृत्य,झांज पथक हलगी वादक या लोकसंस्कृती लोप पावत चाललेल्या आहेत.गिरवी व गिरवी परिसरातील बैलांची संख्या लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे.बैलगाडी शर्यती मुळे होसी बैलगाडी शर्यती मालक यांचे काही बैल ग्रामीण भागातील शेतकरी सांभाळता दिसून येते आहेत.
कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरण संगणकीकरण व ऐआय तंत्रज्ञान यांचा वाढत्या वापरामुळे बैलांची संख्या घसरणीवर लागली आहे.हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच बैल आता ग्रामीण भागात शिल्लक आहेत.कित्येक शेतकरी एकच बैल संभाळतात आणि दोन शेतकरी मिळून वारंगुळा करुन शेतीच्या मशागतीची कामे करतात.वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात शेती क्षेत्र कमी झाले.बैलजोडी सांभाळणे वाढती महागाई व ट्रॅक्टर टाॅली यांची वाढती मागणी यामुळे शेतकऱ्यांना बैलं संभाळणे कठिण झाले.यामधून शेतीच्या क्षेत्रातील बैलांची संख्या लक्षणीय घटलेली आहे.
अशा पाश्र्वभूमीवर बेंदूर सणाला बेंदराचा मान असलेल्या गावातील मानकरी शेतकऱ्यांना बेंदरासाठी बैल विकत घेणे किंवा दुसऱ्या कडून बैल सणाच्या दिवशी माना पानासाठी घेणे आवश्यक झाले आहे.गावोगावच्या बैलांच्या जोड्या कमी झाल्यामुळे गावात आता पुर्वी सारखी बेंदराची मोठी मिरवणूक व माना पानावरुन होणारी वादावादी संघर्ष आता इतिहासजमा झाले आहेत.कदाचित आता भविष्यात गावोगावी टॅक्टरची वाजतगाजत मिरवणूक निघेल अशी परिस्थिती आहे.सध्या काही वर्षांपासून मिरढे सारख्या काही गावातून वाजतगाजत टॅक्टरची मिरवणूक निघते.हिच भविष्यात प्रथा रुढ होईल असे संकेत ग्रामीण भागात दिसून येते आहेत.