ग्रामीण वार्तामहाराष्ट्र
मायणी :-मंडलात 60 टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण.
प्रतिनिधी:- दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मायनी मंडलात 60 टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण____दिलीप दाभाडे मायणी प्रतिनिधी___खटाव तालुक्यातील प्रतिष्ठित असणाऱ्या मायणी मंडलातील खरीपाच्या यंदा 60 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून सध्या एक दोन दिवसात उघडी असल्याने येत्या एक-दोन दिवसात शंभर टक्के पेरण्या पूर्ण होतील अशी माहिती मायणी मंडलाधिकारी दिलीप दाभाडे यांनी दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की उडीद 439 हेक्टर मुग 198 हेक्टर भुईमूग 93 हेक्टर तूर दोन हेक्टर बाजरी 278 हेक्टर मका 78 तृणधान्य 40 हेक्टर सोयाबीन 426 हेक्टर वाघा घेवडा 531 हेक्टर कांदा 43 हेक्टर एकूण 6167 हेक्टर पैकी 3629 हेक्टर वर पेरणी झाली आहे सततच्या रिमझिम पावसामुळे पिकाची उगवण चांगली येईल पेरणीसाठी उशीर झाला असला तरी रब्बी हंगाम वेळेवर होईल असेही त्यांनी सांगितले.