कराड:- म्होप्रे येथे घरावर झाड पडून घराचे नुकसान.
पत्रकार अशितोष चव्हाण:-7378619519

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-820871748
पत्रकार अशितोष चव्हाण
मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी सायंकाळी 5 च्या दरम्यान झालेल्या विज वाऱ्याच्या पावसात म्होप्रे तालुका कराड येथील शांता अवघडे यांच्या घरावरती झाड पडून घराचे नुकसान झाले. याची माहिती लागताच म्होप्रे गावचे माजी सरपंच राहुल संकपाळ यांनी त्याची पाहणी करून मोबाईल वरून आदर्श माता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि पत्रकार विश्वास बाबुराव मोहिते माझ्याशी संपर्क केला. यावेळी राहुल संकपाळ विश्वास मोहिते त्याचबरोबर काही ठराविक ग्रामस्थांनी त्या ठिकाणी पाहणी केली. घरावर पडलेल्या विजेच्या तारा काढण्यासंदर्भात विश्वास मोहिते यांनी कनिष्ठ अभियंता कांबळे यांच्याशी संपर्क साधला त्याचबरोबर अवघडे यांच्या घरावरती हे झाड पडण्याची संपूर्ण माहिती विश्वास मोहिते आणि राहुल संकपाळ यांनी घेतली. प्रशासकीय आणि शासकीय मदतीसाठी पाठपुरावा करणार असल्याबाबत राहुल संकपाळ आणि विश्वास मोहिते यांनी अवघडे कुटुंबीयांना चर्चेदरम्यान शब्द दिला.