ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी :-पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची मायणी मेडिकल कडून रुग्णसेवा.
प्रतिनिधी:- दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची मायणी मेडिकल कडून रुग्णसेवा मायणी प्रतिनिधी___मल्हार पेठ पंढरपूर मार्गावरून पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना मायणी मेडिकल कॉलेज मार्फत मोफत रुग्ण सेवा तपासणी व औषधोपचार करण्यात आले यामध्ये वडगाव जयराम स्वामी येथील जयराम स्वामी पालखी दिंडी सखुबाई पालखी उंब्रज येथील पालखी व अन्य पालखीतील वारकऱ्यांना मोफत रुग्णसेवा तपासणी व औषधी उपचार करण्यात आली या शिबिरात सुमारे 100 पेक्षा जास्त वारकऱ्यांनी भाग घेतला हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर आनंदराव अर्जुनी डॉक्टर सचिन साळुंखे डॉक्टर दत्ता तांबेकर काजल बागल आरती हजारे डॉक्टर अभिजीत देशमुख दीपक निकम संदीप कांबळे प्राध्यापक दिलीप पुस्तके यांनी विशेष प्रयत्न केले कार्यकारी अधिकारी संदीप देशमुख यांनी योग्य व्यवस्थापन केले.