ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-हरीगाव येथे ज्युबिली वर्षाचा महागुरूस्वामी बरेटो यांचे उपस्थितीत समारोप सोहळा संपन्न.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

हरीगाव येथे ज्युबिली वर्षाचा महागुरूस्वामी बरेटो यांचे उपस्थितीत समारोप सोहळा संपन्न.

श्रीरामपूर प्रतिनिधी ( RPS स्टार न्यूज )] :-संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे नाताळ उत्सवात रविवारी ज्युबिली वर्षाच्या समारोप प्रसंगी नाशिक धर्मप्रांत महागुरुस्वामी बार्थोल बरेटो यांनी प्रतिपादन केले की “आज वर्षाच्या शेवटच्या रविवारी आपण प्रभू येशू ,पवित्र मारिया आणि संत योसेफ यांच्या पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहोत आज आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत ह्या वर्षाची आठवण करून देताना आपण एका मानवी कुटुंबाचा भाग आहोत आणि त्याचबरोबर देवाच्या कुटुंबाचा म्हणजे देऊळ मातेचा भाग आहोत.दोन्ही कुटुंबामध्ये आपल्याला विशेष अधिकार आणि जबाबदाऱ्या आहेत दोन्ही ठिकाणी आपण प्रेम आणि शांतीने जगताना आपले तारण साधतो.चौथ्या आज्ञाच्या व्याख्याप्रमाणे आई-वडिलांचा आदर केला पाहिजे .असे सिराख यांनी सांगितले .जो आपल्या वडिलांचा आदर करतो त्याला देव दोन वरदान देतो संपत्ती आणि दीर्घायुष्य जो आपल्या पित्याचा आदर करतो तो दीर्घायुषी होईल.आपण प्रेम कृतज्ञता दया क्षमा आणि एकमेकांची काळजी घेण्याचे गुण अंगीकृत करावे .आजच्या या सणाच्या दिवशी आपल्या चर्चमध्ये या प्रांगणात ज्यूबिली वर्षाचा समारोप होत आहे गेल्या वर्षी 2024 च्या पवित्र कुटुंबाच्या सणानिमित्त संत अन्ना कॅथेड्रलमध्ये ज्यूबिली वर्षाचे उद्घाटन झाले होते आज एका वर्षानंतर या वर्षाची सांगता होत आहे.आपण तीर्थयात्री आहोत हे जग आपले कायमचे घर नाही.आपली यात्रा आशेकडे स्वर्गाकडे आहे.या यात्रेत आपले कर्तव्य आहे की रोज भेटणाऱ्या लोकांना आजाऱ्याना गरिबांना एकट्याना स्थलांतरित लोकांना युद्धग्रस्तांना निराश झालेल्या तरुणांना वृद्धांना जे विसरले गेले आहेत त्यांना आशेचा किरण दाखविणे पवित्र कुटुंबाने दैनंदिन जीवनात आशा जपली आपणही तसेच जगू या ज्युबिली वर्ष संपले तरी आशेची यात्रा सुरु राहील पवित्र कुटुंब आपल्याला प्रेरणा देत राहील की प्रेम क्षमा सेवा यातून आशा पसरवावी चला आजपासून नव्या उत्साहाने हे व्रत घेऊ या.आपण आशेचे तीर्थयात्री राहू आणि इतरांना आशा देऊ.या वर्षात दानधर्म उपासना एकत्र येऊन आशेचा संदेश पसरवला.”

आजच्या या भव्य कार्यक्रमात हरीगाव प्रमुख धर्मगुरू रे फार डॉमनिक रोझारिओ,फा.फ्रान्सिस ओहोळ,फा.संतान रॉड्रीग्ज,फा.ज्यो गायकवाड,तसेच नासिक धर्मप्रांतातील सर्व धर्मगुरू सहभागी होते.प्रारंभी सर्व धर्मगुरू व महागुरुस्वामी बार्थोल बरेटो समवेत प्रभू येशूची प्रतिमा [क्रॉस ]घेऊन समारंभापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.ख्रिस्तप्रसादानंतर,सर्वाना केक वाटण्यात आला.यावेळी फा.डॉमनिक याना वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या.महागुरूस्वामी बार्थोल बरेटो यांनी सर्व भाविक,सर्व धर्मगुरू,धर्मभगिनी,यांचे आभार मानले.

RPS STAR NEWS

YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button