वाई:-वाई:-सिद्धनाथवाडी वाई झोपडपट्टी गुरेबाजार परिसरातील नगरपरिषदेने बांधलेल्या रहिवासी ईमारतीचे ड्रेनेज चे पाणी रस्तावर सोडल्याने व ते घरात शिरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
वाई :-
वाई :प्रतिनिधी
सिद्धनाथवाडी वाई झोपडपट्टी गुरेबाजार परिसरातील नगरपरिषदेने बांधलेल्या रहिवासी ईमारतीचे ड्रेनेज चे पाणी रस्तावर सोडल्याने व ते घरात शिरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सिद्धनाथ वाडी या भागातील झोपडपट्टी गुरेबजार मध्ये गेली अनेक दिवसांपासून ड्रेनेज चे पाणी रस्त्यावर सोडुन दिल्याने या बाबतची तक्रार नागरिकांनी वाई नगरपरिषद कार्यालयात केली तसेच या भागातील तत्कालीन नगरसेवक यांना सदर माहिती दिली परंतु त्यांनी नागरिकांना तुम्ही तुमच्या पैशाने दुरुस्ती करुन घ्या व तसेच मला या बाबतीत काही सांगु नका तुम्ही तुमची व्यवस्ता करा मला काही फरक पडत नाही. अश्या उद्धट भाषेत सदर भागातील नागरिकांना या भागातील माजी नगरसेवक बोलत असल्याने लोक प्रतिनिधीवंर तीव्र संताप नागरिकांनी व्यक्त केला.
सदर ड्रेनेज चा पाणी सध्या नागरिकांच्या घरामध्ये शिरत असल्याने साथीच्या रोगाची लागण होण्याची दाट शक्यता आहे नगरपरिषद प्रशासनाने या अत्यावश्यक बाबीकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने नगर परिषद प्रशासन नागरिकांच्या जीवीताशी खेळत असल्याचे निदर्शनास येते.
आरोग्याच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या या बाबीकडे तत्काळ लक्ष देऊन सुधारणा न केल्यास नागरिकांना आंदोलनाचा मार्गाने आपल्या मागण्या मान्य कराव्या लागतील. तसेच या बाबतची तक्रार आ मकरंद आबा पाटील यांच्या निदर्शनास आनुन दिली जाईल असा इशारा नागरिकांनी दिला.