आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-विद्यार्थ्यांनी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या विचारावर वाटचाल करावी-विश्वास मोहिते.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

विद्यार्थ्यांनी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या विचारावर वाटचाल करावी-विश्वास मोहिते.

वाचनाने विद्यार्थी घडतो, विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जपून विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी बरोबर ज्ञानार्थी झाले पाहिजे. आणि विद्यार्थी ज्ञानार्थी होण्यासाठी माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचारावरती वाटचाल करावी असे मत आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी व्यक्त केले.

सुपने येथील केदारनाथ शिक्षण संस्थेच्या श्री केदार हायस्कूल सुपने या ठिकाणी माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन आणि हात धुवा दिन साजरा करण्यात आला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक गुरवसर पाडळी केसेचे सामाजिक कार्यकर्ते साजिद पटेल,आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मोहिते म्हणाले,डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी संघर्षातून स्वतःची सामाजिक आणि राजकीय प्रगती केली. सर्वसामान्य नागरिक ते देशाचे राष्ट्रपती हा त्यांचा संघर्षमय प्रवास डोळ्यासमोर ठेवल्यास विद्यार्थ्यांना यश प्राप्ती करणे कदापि अवघड नाही. म्हणून आजच्या विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जपून उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच वाटचाल केली पाहिजे असेही विश्वास मोहिते म्हणाले. स्वागत व प्रास्ताविक श्री कुंभार सर यांनी केले तर आभार रणसिंग सर यांनी मानले. कार्यक्रमास सुहास गुरवसर भिंगारदिवेसर,झंजे सर, कुंभारसर,शेडगेसर, श्रीमती थोरात मॅडम,शेवाळेसर, चव्हाण सर,सावंतसर, नलवडेसर,श्रीमती माळीमॅडम,पाटीलमॅडम, रणशिंग सर सह सर्व शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button