कणकवलीत सर्व विरुद्ध आम्ही लढण्यास तयार – समीर नलावडे
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कणकवलीत सर्व विरुद्ध आम्ही लढण्यास तयार – समीर नलावडे

कणकवली महाराष्ट्र राज्यात महायुती आहे. त्यामुळे कणकवली नगरपंचायतीची निवडणूक भाजपने स्वबळावर लढण्याचे अद्यापही आदेश आलेले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की नाही याचा निर्णय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे घेतील. जो काही निर्णय ही मंडळी घेतील, त्यानुसार सिंधुदुर्गातील भाजपचे कार्यकर्ते निवडणुका लढवतील, असे स्पष्टीकरण माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिले. कणकवली नगरपंचायतीच्या
आजपर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये आम्ही | विरुद्ध सर्वजण अशाप्रकारे झाल्या आहेत. यंदाच्या | निवडणुकीत आम्ही विरुद्ध सर्वजण अशाप्रकारची परिस्थिती निर्माण झाल्या, आम्ही निवडणुका लढविण्यासाठी सज्ज आहोत. न. पं. ची निवडणूक लढविण्यासाठी खा. नारायण राणे, मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली लढण्यासाठी आमची सर्व टीम सज्ज आहे. कारण मागील पाच वर्षांत शहरात भाजपच्या माध्यमातून झालेल्या विकासाच्या जोरावर आम्ही शहरवासीयांना आम्हाला पुन्हा सत्ता देण्याचे आवाहन करत आहोत असे नलावडे यांनी सांगितले.




