श्रीरामपूर:-जिल्हा बँकेत लोखंडाचे सोने करणाऱ्या परिसाची चौकशी करा !!
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
जिल्हा बँकेत लोखंडाचे सोने करणाऱ्या परिसाची चौकशी करा !!

शेतकरी संघटनेसह फसवणूक झालेल्या तक्रारदारांची विभागीय सहनिबंधक नाशिक यांच्याकडे चौकशीची मागणी.
श्रीरामपूर:-अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन सर्व आजी-माजी संचालक मंडळ तसेच श्रीरामपूर शिवाजी रोड शाखेचे शाखाधिकारी त्याचप्रमाणे सोने तारण कर्जरोखे अधिकारी रामेश्वर कचरू माळवे व अशोक कचरू माळवेसह श्रीरामपूर तालुक्याचे संचालक भानुदास मुरकुटे-करण ससाने या सर्वांनी सामूहिकरीत्या संगणमत करून बँकेस खोटे सोने तारण करून जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांचे बोगस कर्ज रोखे दाखवून भ्रष्टाचार केला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. याबाबतची तक्रार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुका अध्यक्ष युवराज जगताप, डॉ. दादासाहेब आदिक, साहेबराव चोरमलसह फसवणूक झालेले तक्रारदार विशाल आदिक, जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी नानासाहेब मांढरे, खंडेराव सरोदे, सर्जेराव देवकर, प्रभाकर गोरे, राजेंद्र अंबिलवादे आदीनीं विभागीय सहनिबंधक संभाजी निकम व सहाय्यक विभागीय सहनिबंधक संतोष बिडवयी सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक यांचेकडे एका निवेदनाद्वारे आहे.
सदर बाब ही 2019 मध्ये उघडकीस आल्यानंतर नकली सोने तारण कर्जरोखे बोगस नावे बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी नानासाहेब मांढरे, विशाल आदिक ,लता गोरे, प्रकाश खैरे, प्रमोद अंबिलवादे, राजू अंबिलवादे, खंडेराव सरोदे, सुनील a सरोदे, लक्ष्मण पटारे, ज्ञानेश्वर सोनार, इसाक पटेल, रेशमा पटेल, कैलास हरे, विश्वास सराफ, प्रदीप करंडे, युनुष शेख, सर्जेराव देवकर, जितेश खैरे, योगेश चिंतामणी, ज्ञानेश्वर नागरे, हेमंत सोळंकी सह एकूण 70 बोगस खातेदारांच्या नावे नकली सोने तारण करून दीड ते दोन कोटी रुपयांचे कर्जरोखे बँकेतून काढले आहेत.
सदर बाब ही तक्रारदार खातेदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. 2019 मध्ये सदर बाब उघडकीस आल्यानंतर तक्रारदारांनी तत्कालीन बँकेचे संचालक करण ससाने यांचे कडे सविस्तर बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी संचालक ससाने यांनी संबंधित फसवणूक झालेल्या खातेदारांना आश्वासित केले की आपण सदर रक्कम संबंधित शाखाधिकारी व बँकेचे सोनेतारण मूल्यांकन अधिकारी अशोक माळवी व राजेंद्र माळवे यांच्या मालमत्ता विक्रीनंतर भरून घेऊ असे आश्वासित केले. बँकेच्या संचालकांवर विश्वास ठेवून संबंधित फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. परंतु तदनंतर चार महिन्यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयाकडून संबंधित सत्तर खातेदारांवर बँकेची फसवणूक केले प्रकरणी फौजदारी व वसुलीसाठी दिवाणी दावे न्यायालयात दाखल केले. आज रोजी सहकार न्यायालयात संबंधितांवर वसुलीसाठी निकाल लागला असून सर्वसामान्य फसवणूक झालेल्या लोकांच्या मालमत्ता बँकेच्या बेकायदेशीर वसुलीसाठी जप्त होणार आहेत. याबाबत फसवणूक झालेल्या नागरिकांनी 18 4 2019 रोजी पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन श्रीरामपूर येथे संबंधितांवर गुन्हे दाखल करून चौकशी होण्यासाठी अर्ज केला होता .परंतु बँकेच्या संचालकांनी आपल्या राजकीय सत्तेचा वापर करून पोलीस प्रशासनावर दबाव आणलेने सदर तक्रारीची दखल घेतली नाही का? असाही प्रश्न निर्माण होत आहे.
वास्तविक सदर प्रकरणाबाबत एक व्यक्ती बँकेस फसवू शकतो परंतु 70 लोक बँकेत फसवूच शकत नाही तसेच बँकेने नेमलेला सोने तारण मूल्यांकन अधिकारी हा बँकेच्या संचालक मंडळाच्या जबाबदारीवर नेमलेला असतो. त्याचप्रमाणे सोने तारण कर्जरोखे व्यवहार करताना बँकेकडे सोने तपासणीसाठी मशीनची ही उपलब्धता असते त्यामुळे सदर खोटे सोने तारण करतेवेळी शाखाधिकार्यांनी गोल्ड लोन व्हॅल्युअर विश्वास न ठेवता आपल्या स्तरावरून मशीनच्या साह्याने सोन्याची गुणवत्ता पाडताळून पाहणे बँकेच्या दृष्टीने शाखाधिकारी यांची जबाबदारी असते. परंतु सदर सोने तपासणी मशीनच्या सहाय्याने तपासणी का झाली नाही.
तसेच तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सदर खोटे सोने तारण कर्जरोखे प्रकरणांवर आमच्या सह्या नाही असे काहींचे म्हणणे आहे. वरील सर्व बाबी नुसार श्रीरामपूर तालुक्याच्या शहर शाखेने श्रीरामपूरचें संचालक ,शहर शाखेचे शाखाधिकार्यासह सोने तारण मूल्यांकन अधिकारी यांनी सामुहिकरीत्या शेतकऱ्यांच्या बँकेची फसवणूक करून नुकसान केले आहे. तरी याबाबत श्रीरामपूरसह अनेक तालुक्यांमध्ये खोटे सोने तारण ठेवून बोगस कर्जरोखे झाले असल्याची माहिती काही अधिकाऱ्यांकडून दबक्या आवाजात कुठेही चर्चा न करण्याच्या अटीवर झालेली आहे. तरी याबाबतआपल्या स्तरावरून जिल्ह्यातील किती शाखेमध्ये अशा प्रकारचे बोगस सोने तारण कर्ज प्रकरने आहेत. सोने कारण कर्जरोखे प्रकरण मध्ये बँकेने दर सहा महिन्यांनी दुसऱ्या गोल्डव्हॅल्यूअर क्रॉस चेकिंग का केले नाही .केले असेल तर क्रॉस चेकरच्या लक्षात सदर बाब का आली नाही.त्या संदर्भात चौकशी करून खातर जमा करावी.
तसेच दिलेल्या तक्रार अर्जामध्ये बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत श्रीरामपुर तालुक्याचे सर्व संचालकांसह व्यवस्थापन समितीवर गुन्हेगारी प्रवृत्तीचा शाखा अधिकारी व सोने तारण मूल्यांकन अधिकारी नेमणूक संगणमत करून शेतकऱ्यांच्या फसवणूक केले प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी विनंती मागणी अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेसह फसवणूक झालेल्या 70 नागरिकांनी केली आहे. तरी याबाबत आपल्या स्तरावरून संबंधितांना चौकशी कामी तात्काळ आदेश देऊन न्याय द्यावा अन्यथा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी संघटनेचे राज्य अँड.उपाध्यक्ष काळे ज्येष्ठ विधीतज्ञ उच्च न्यायालय औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल.
चौकट:-नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांची बँक असून सदर बँकेकडून अशा पद्धतीने सोने तारण कर्ज बरोबरच शेती क्षेत्रा व्यतिरिक्त उद्योग व्यवसायाला कर्ज वाटप करणे हे बँकेच्या उद्दिष्टांमध्ये नाही.
वास्तविक जिल्हा सहकारी बँकेची निर्मिती ही शेती क्षेत्राला व शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी झालेली आहे.
परंतु मागील दहा पंधरा वर्षापासून जिल्ह्यात असलेले सहकारी साखर कारखाने हे राज्य सहकारी बँकेकडून कर्ज न घेता जिल्हा सहकारी बँकेतून आहे . सदर कारखाने घेत असलेले कर्ज हे वेड न करता सातत्याने त्यामध्ये वाढ होत आहे.या बाबींचा परिणाम शेती क्षेत्राला वित्तीय पुरवठा करण्यावर झाला आहे. शेती क्षेत्राला कर्ज वाटप करताना वित्तीय कर्ज पुरवठा मध्ये अपेक्षित वाढ नाही.अशा पद्धतीचे धोरण व्यवस्थापनाने अवलंब केल्यास जिल्हा बँकेचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
अनिलराव औताडे
जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना अ.नगर




