ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव:-मायणीत मोकाट कुत्र्यांचा उच्छाद.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
मायणीत मोकाट कुत्र्यांचा उच्छाद.

मायणी प्रतिनिधी—–सध्या मायणी तालुका खटाव येथील विशेषता चांदणी चौक परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी***-प्रशांत कोळी सध्या माहिती परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून त्यातील एक कुत्रे पिसाळलेले आहे त्याने सहा ते आठ लोकांचा चावा घेतला आहे सतर्क रहावी अशा सूचना पोलीस पाटील प्रशांत कोळी यांनी दिलेल्या आहेत याबाबत सरपंच प्रतिनिधी रणजीत माने यांनी सांगितले की मी, डॉक्टर विकास देशमुख, स्वप्निल घाडगे, कुत्र्याचा बंदोबस्त करत असून नागरिकांनी विशेषता लहान मुलांनी घाबरून जाऊ नये तसेच हॉटेल, मिठाईवाल्यांनी आपला खराब माल रस्त्यावर फेकू नये लवकरच आम्ही मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करत आहोत असे सांगितले.




