कतार:-::FIFA विश्वचषक अंतिम सामना 2022–! अर्जेन्टिना विरुद्ध फ्रान्स ! अतिरिक्त वेळेत मबापे,मेस्सीची जादू मार्टिनेज गेमचेंजर ★अर्जेन्टिना विश्वविजेता ★
प्रतिनिधी सागर पिसाळ:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण (8208717483)
(क्रीडा)
(कतार) ::FIFA विश्वचषक अंतिम सामना 2022–! अर्जेन्टिना विरुद्ध फ्रान्स ! अतिरिक्त वेळेत मबापे,मेस्सीची जादू मार्टिनेज गेमचेंजर ★अर्जेन्टिना विश्वविजेता ★
कतार येथे सुरू असणाऱ्या विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम लढत लुसेल स्टेडियम वर फ्रान्स विरुद्ध अर्जेन्टिना या बलाढ्य संघात झाली. या महत्वाच्या सामन्यात सामन्याच्या 23 व्या मिनिटाला पेनल्टी वर पहिला गोल नोंदवत मेस्सी ने अर्जेन्टिना ला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली थोड्याच वेळात डी मारिया ने सामन्याच्या 36 व्या मिनिटाला ने गोल करून पहिल्याच सत्रात मध्ये 2-0 अशी मोठी आघाडी घेतली, सामन्याच्या दुसऱ्या सत्रात फ्रान्स ने धमाकेदार खेल करत सामन्यात रंगत आणली.80 व्या मिनिटाला फ्रान्स कडून मबापे ने पेनल्टी वर गोल केला , पुढील 1 का मिनिटातच पुढील गोल करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला.
सामना 30 मिनिटांच्या अतिरिक्त वेळात गेल्यानंतर सामन्याच्या 109 व्या मिनिटाला लियोनेल मेस्सी ने निर्णायक गोल करत अर्जेन्टिना ला 3-2 अशी आघाडी घेईल.ती अर्जेन्टिना ला टिकवता आली नाही मबापे ने पुन्हा सामन्याच्या 116 व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक नोंदवत पुन्हा सामना 3-3 असा बरोबरीत आणला. दोन्हीही संघांच्या जबरदस्त खेळीने सामना पेनल्टी शूटआऊट मध्ये गेला.
पेनल्टी शूटआऊट मध्ये अर्जेन्टिना ने फ्रान्स चा 4-2 ने पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले…..
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)