वडूज :-नातं रक्ता पलीकडचं,माणुसकीचं, आपुलकीचं…..
प्रतिनिधी:- मुन्ना पटेल खटाव :-7249654507

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
नातं रक्ता पलीकडचं,माणुसकीचं, आपुलकीचं…..
गेल्या काही दिवसांपूर्वी पासून वडूज परिसरात एक अनोळखी बेवारस मनोरुग्ण फिरत होता बहुतांश लोकांनी समाज दृष्टीकोनातून कॉल केले पण ज्यावेळी यास आपण हक्काचा निवारा मिळवून देऊ ठरवलं त्या वेळी नेमक *वडुज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख साहेबांचा कॉल आला आणि म्हणाले आपण करू मदत त्यास रस्त्यावरून मधून चालत आहे बस स्थानक परिसरात फिरत आहे यामुळे भीतीचे वातावरण आहे मग मोठे बंधू सदिच्छा सोशल फौंडेशन चे अध्यक्ष डॉ संतोष मोरे यांच्या शी चर्चा केली त्यांनी सांगितले* आपल्या अंबुलन्स मधून सोडून मग पोलीस ठाण्याचे पत्र घेतलं मग यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रवी साहेब यांना कल्पना दिली ते पण म्हणाले घेऊन या आणि झालं त्याचा वडुजचा प्रवास संपवून त्यास रविवार सुट्टीचा वार बघून सदिच्छा सोशल फौंडेशन च्या माध्यमातून युवा संकल्प सोशल फौंडेशन च्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने त्यास यशोधन च्या निवारा केंद्रात सोडलं या पुढे लवकरच औषध देऊन उपचार करून त्याला त्याचं घर शोधून त्याच्या कुटुंबात सोडण्याचं काम आम्ही यशोधन च्या माध्यमातून करू…..
*अशा लोकांचा तिरस्कार करू नका घर सुटलं रस्त्यावर आले पण आपल्या सारख्या समाजाने वाढलेलं केस विस्कळीत अवतार म्हणून त्यांना नाकारलं असो अशा लोकांना मदतीचा हात देऊ कारण त्यांना पण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे…*
*आपण तो मिळवून देऊ कारण माणुसकी जिवंत आहे*
आज यास यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट चा निवारा मिळवून देण्यास विशेष सहकार्य करणारे अध्यक्ष रवी बोडके साहेब पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख साहेब सदिच्छा सोशल फौंडेशन चे अध्यक्ष डॉ संतोष मोरे सर विजयजी राजगे पुष्कर कापड दुकानचे राहुल घोरपडे युवा संकल्प सोशल फौंडेशन चे माझ्या समवेत उपाध्यक्ष प्रवीण बागल मा सरपंच सदाभाऊ बागल म सरपंच अनिलजी चव्हाण शेठ पोलीस दीपक देवकर नंदू जाधव श्रीनाथ बागल राहुल जमदाडे विशाल शिंदे रिहाल मुल्ला प्रसाद जगदाळे ओंकार देवकर पप्पू खुडे हणमंतराव माने प्रदीप शेडगे अक्षय जाधव श्रीराम बागल श्रीकांत बागल गणेशजी जाधव शिवाजी चव्हाण उपस्थित होते…
योगेश जाधव
युवा संकल्प सोशल फौंडेशन खटाव माण
सरपंच ग्रामपंचायत येरळवाडी
8806638763