आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माळेवाडी:-डॉ.धोंडे कर्तुत्व गौरव पुरस्काराने राज्यात पहिले मानकरी – जिल्हाध्यक्ष अनिल औताडे

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) डॉ.धोंडे कर्तुत्व गौरव पुरस्काराने राज्यात पहिले मानकरी – जिल्हाध्यक्ष अनिल औताडे

माळेवाडी / श्रीरामपुर ( RPs स्टार न्युज प्रतिनिधी ) अहिल्यानगर जिल्ह्यातील खाजगी पशुवैद्यकीय सेवा देणारे तालुका राहुरी मौजे सडे येथील डॉ . लक्ष्मण धोंडे (बि .व्ही . एससी ) हे कर्तुत्व गौरव पुरस्कार २००२६ चे राज्यातील पहिले मानकरी ठरले आहेत यापुर्वी अशा प्रकारचे पुरस्कार छोट्या प्राण्यांसाठी सेवा देणाऱ्या पशुवैद्यकांना दिले जात होते परंतु यावर्षीचा पुरस्कार हा मोठ्या प्राण्यांना ( लार्ज ऍनिमल ) खाजगी व्यावसायिक सेवा देणाऱ्या डॉ . छोंडे यांना देण्यात आला
मुंबई येथे ( VPWA ) आयोजित आंतरराष्ट्रीय पशुवैद्यक चर्चास सत्रामध्ये ग्रामीण भागातील पशुसेवा व नवीन बहुउपयोगी तंत्रज्ञान संशोधनाबद्दल सम्मानित करण्यात आले . त्यांचा सन्मान रॅमन मॅगसेस पुरस्कार प्राप्त कर्मयोगी दांपत्य डॉ . सौ . मंदाकिनी व डॉ प्रकाश जी आमटे यांच्या हस्ते गौरविण्यात आले त्यांचे अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने अभिनंदन व कौतुक करून सत्कार करण्यात आला तालुकाध्यक्ष युवराज जागताप राज्य सचिव रुपेद्र काले ‘ प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब व शिवाजीराव गायकवाड ‘ नेवासा तालुका अध्यक्ष अशोक काळे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर ‘ जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे ‘ जिल्हा युवा आघडीचे बच्चु मोडवे ‘ किरण लंघे अशोक टेकाळे ‘ शरद पवार ‘ डॉ दादासाहेब आदिक ‘ सुदामराव औताडे ‘ दिलीप राव औताडे ‘ गोविंद वाघ . डॉ शुभम औताडे आदिंनी सत्कार करून अभिनंदन केले .
यावेळी जिल्हाध्यक्ष औताडे म्हणाले की राहुरी तालुक्यातील मौजे सडे येथील डॉ .लक्ष्मण धोंडे हे शेतकरी कुटुंबातील उच्च शिक्षण घेऊन शिक्षण घेऊन त्यांनी मुक्या जनावरांच्या वेदना कमी करणे बरोबरच पर्यायाने शेतकऱ्यांच्याही वेदना कमी करण्यासही मोठी मदत केली . २००१ मध्ये मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय – परेल मुंबई . येथे बी व्हीं . एससी अँड ए . एच . ही डिग्री घेऊन खाजगी पशुवैद्यकीय सेवा प्रदान करण्याचा निर्णय घेतला ज्या काळी शासन स्तरावर प्रथम श्रेणीच्या नोकऱ्या मिळत असूनही शेतकरी कुटुंबाची नाळ जोडल्यामुळे डॉ लक्ष्मण धोंडे यांनी खाजगी पशुवैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला . आजही मोठ्या जनावरांसाठी बी एस सी पदवी प्राप्त केलेले पशुवैदक यांची खाजगी क्षेत्रात खूप मोठी कमतरता दिसून येत आहे . गेली २५ वर्ष आहो रात्र सातल्प ठेवून जिल्ह्यात पशु सेवेचे मोठे योगदान देण्याचे कार्य घडले . . . त्यांचे पशुधनाभिमुख काम ‘ पशुपालकांविषयी संवेदनशीलता , नवनवीन तंत्रज्ञान ‘ गाई गोठ्यांपर्यंत सेवा देण्यासाठी तत्परता ‘ संकरित गाईंचा मुक्त गोठा व्यवस्थापन हा उपक्रम गावोगावात पोहोचवण्यात मोठा हातभार ‘ मानवी सेवेप्रमाणेच मुख्य प्राण्यांना आपल्या बुद्धी कौशल्याने सेवा देऊन वेदना कमी केल्या … त्यामुळे साहजिकच गोपालक शेतकऱ्यांच्या वेदनाही खऱ्या अर्थाने कमी करण्याचे काम डॉ . धोंडे यांनी केले त्यांच्या पंचवीस वर्षाच्या अनुभवातून त्यांच्या हातून शेकडो बीएससी व डिप्लोमा पदव्या घेतलेल्या पशुवैद्यककांना आपल्या अनुभवाचे ज्ञान देण्याचे कार्य केले त्यामुळे शेतकरी कुटुंबातील माणसाला हा पुरस्कार म्हणूजे हिमालयाच्या उंची एवढा वाटावा हे चुकीचे ठरणार नाही … त्यांच्या पुढील कार्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

2) हरेगाव येथे टेनिस प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा प्रारंभ.

माळेवाडी / श्रीरामपुर RPs स्टार न्युज ) श्रीरामपुर तालुक्यांतील हरेगाव येथे मॅर्निंग क्रिकेट क्लब हरेगाव यांच्या वतीने व सुर्या प्रतिष्ठान ‘ परफेक्ट मोटर्स ‘ यांच्या सौजन्याने हरेगाव टेनिस प्रीमियर लीग २०२६ क्रिकेट स्पर्धांना शुक्रवारी प्रारंभ झाला या क्रिकेट स्पर्धा मध्ये विजयी संघाला प्रथम पारितोषिक रु २१००० / – मेजर योगेश शिरसाठ व विशाल देवरे यांच्यातर्फे ठेवण्यात आले आहे . द्वितीय पारितोषिक रुपये १५००० / – सुहास धनेधर ‘ शरद नागरगोजे ‘ व सचिन शिंदे यांचे तर्फे ‘ तृतीय पारितोषिक रुपये १०००० / – सुभाष गायकवाड अजित गायकवाड यांच्यातर्फे ‘ चतूर्थ पारितोषिक रु ७००० / – दीपक नवगिरे , सचिव श्रीराम असंघटित बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्य व रामचंद्र आव्हाड उंदिरगाव यांच्यातर्फे ठेवण्यात आले आहे क्रिकेट स्पर्धा शुभारंभ सुनील शिनगारे , शौकत पठाण , नाजीम शेख जेष्ठ पत्रकार बी आर चेडे अमोल नाईक यांच्या हस्ते करण्यात आला . श्रीराम संघ श्रीरामपुर व आर्या लाईव्ह श्रीरामपुर या दोन संघामध्ये पहिला सामना झाला त्यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे ‘ सचिन गुजर ‘ राजेंद्र पाऊलबुद्धे ‘ अमोल नाईक ‘ अध्यक्ष सुर्या प्रतिष्ठान हरेगाव आकाश सुर्यवंशी , सुनील शिनगारे ‘ रोहित यादव परफेक्ट मोटर्सरचे नाजीम शेख ‘ शौकत पठाण , सुहास धनधर ‘ अतुल भालेराव दीपक नवगिरे ‘ राजु चव्हाण ‘ अय्याज शेख ‘ मुजीब मणियार रवी आव्हाड ‘ सागर कुलथे आदी उपस्थित होते.

3) श्रीरामपुरात उद्या शांतीगिरी महाराजांच्या हस्ते ढोबळे हॉस्पीटलचा भव्य उद्घाटन सोहळा.

माळेवाडी / श्रीरामपुर ( RPs स्टार न्युज ) श्रीरामपुर शहरात उद्या रविवारी दि २५ जानेवारी रोजी सायं ६ वा . मानसोपचार व व्यसनमुक्ती केंद्र असलेले ढोबळे हॉस्पिटलचे उद्घाटन वेरूळ आश्रमाचे जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमासाठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यांच्यासह माजी आमदार भानुदास मुरकुटे आमदार हेमंत ओगले नगराध्यक्ष करण दादा ससाने अविनाश आदिक आदी उपस्थित राहणार आहेत
श्रीरामपुरात नेवासा रोडवर भारत गॅस शेजारी या नवीन हॉस्पिटलचे उद्घाटन होत असून या ठिकाणी मनोविकार व मेंदू विकारातील चिंतारोग ‘ नैराश्य ‘ उदसिनता ‘ भयगंड ‘ छित्रमानस ‘ उन्माद ‘ मंत्रचाळेपणा , तसेच दारू , तंबाखू ‘ धुम्रपान ‘ गांजा ‘ चरस ‘ भांग ‘ अफू ‘ इत्यादी व्यसनापासून व्यसनमुक्ती या ठिकाणी होणार आहे याशिवाय लेंगिक समस्या ‘ स्मृतीअंश क्लिनीक , बालसमास्या उपचार या सह इ . सी . टी उपचार ( शॉक ट्रिटमेंट ) मेंदू आलेखाची सोय ( इ . इ . जी) फिटस् मिरगी ‘ मंदबुद्धी चिकीत्सा व मार्गदर्शन ‘ स्मृतीपरिक्षण ‘ तणाव क्रोध व्यवस्थापन ‘ वैवाहीक समस्या आ दिंवर अनंता सिटी सेंटर येथे आधुनिक पद्धतीने उपचार होणार आहेत या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य दिनकर सोपान ढोबळे सौ मिनाक्षी दिनकर ढोबळे डॉ मुकुल दिनकर ढोबळे डॉ सौ ऋतुजा मुकुल ढोबळे आदींनी केले आहे

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button