सातारा:-प्राथमिक शिक्षकांची मागणी जुनी पेन्शन पण, ट्रिपल इंजिन सरकारला देतेय टेन्शन,,,,,
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
प्राथमिक शिक्षकांची मागणी जुनी पेन्शन पण, ट्रिपल इंजिन सरकारला देतेय टेन्शन,,,,,
सातारा दि: सर्वश्रेष्ठ दान म्हणजे ज्ञानदान या ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वजण वंदन करतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये या गुरुजनांच्या सेवानिवृत्ती वेतनाला टाच दिल्यामुळे बिकट आर्थिक परिस्थितीशी भविष्यात सामना करावा लागणार आहे .याची जाणीव झालेल्या प्राथमिक शिक्षक संघटनेने जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केलेली आहे. या मागणीसाठी आज छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरात प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या जुन्या पेन्शनमुळे ट्रिपल इंजन लागलेल्या राज्य सरकारचे टेन्शन वाढल्याचे दिसून येत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या काळात या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षक सहभागी होतील असे चिन्ह दिसत आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्य शिक्षक नेते उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे सरचिटणीस किरण यादव ,यांच्यासह प्राथमिक शिक्षकांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित केला होता. मुख्यालय घर भाडेभत्ता, सातवा वेतन आयोग थकबाकी ,नगरपालिका, महानगरपालिका शिक्षक सहावा सातवा वेतन आयोग थकबाकी, वेतन विलंब, रिक्त जागा, कंत्राटी स्वयंसेवक, गणित विज्ञान विषय शिक्षक, विषय पदवीधर भरती, बदली धोरण ,वेतन त्रुटी ,निवृत्ती विषयक लाभ विलंब, पदवीधर वेतनश्रेणी ,सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना एक स्तर वेतनश्रेणी व दिनांक २८ डिसेंबर२०२२ ची अधिसूचना रद्द करावी. वस्ती शाळा शिक्षकांना लाभ देणे. डीसीपीसी कपाती बाबत, ऑनलाईन कामे, कमी पटसंख्या शाळा बंद न करणे, शाळा एकत्रित धोरण बंद करणे, सहाय्यता धोरण बंद करणे, बी एल ओ सर्व शैक्षणिक कामे बंद करणे, आधी मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने हा मोर्चा आयोजित केला होता.
दुपारी शनिवारी अर्धा दिवस प्राथमिक शाळेला सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात प्राथमिक शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी होतील. असे अपेक्षित होते. परंतु पावसाळी वातावरण व इतर काही कारणांमुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक जरी उपस्थित राहिले नाहीत. तरी प्राथमिक शिक्षक समिती माजी संचालिका कामिनी शीलवंत, पुष्पलता बोबडे, रत्नमाला मोहिते, सुलभा सस्ते, रंजना बागल, अफजल काजी, अंजली भिसे, जयमाला चव्हाण, विद्या गाढवे यांच्यासह गजानन वारागडे, श्रीकांत दोरगे, अनिल पिसाळ त्याचबरोबर शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष नवनाथ जाधव आदी मान्यवर शिक्षक उपस्थित होते. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून जे. एस. शेख मॅडम यांना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शिक्षकांच्या न्याय संगत मागण्यांच्या सोडवणुकीसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने घोषणाबाजी करण्यात आली होती.
फोटो – सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना प्राथमिक शिक्षक समिती नेते व शिक्षक (छाया- अजित जगताप सातारा)