मायणी:-ज्योतिष शास्त्र हे विश्वव्यापक आहे. —- ,—-___________वेदमूर्ती नंदकुमार जोशी.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
ज्योतिष शास्त्र हे विश्वव्यापक आहे. —- ,—-___________वेदमूर्ती नंदकुमार जोशी.
मायणी प्रतिनिधी__ज्योतीष शास्त्र हे विश्वव्यापक असून तेवढेच ते रंजक देखील आहे.बदलते तंत्रज्ञान स्वीकारून ज्योतिषशास्त्राकडे केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक अंगाने देखील पाहणे गरजेचे आहे कारण ज्योतिष शास्त्रात तिथीला फार महत्त्व आहे आहे त्यामुळे ज्योतिष शास्त्राच्या जन्म मुळातच वेदातून झाला आहे असे स्पष्ट मत वरुड तालुका खटाव येथील ज्योतिष अभ्यासक नंदकुमार जोशी यांनी सांगली येथे ज्योतिष अधिवेशनात बोलताना व्यक्त केले ग्रहसंकेत ज्योतिष विद्यालय आयोजित पदवीदान समारंभ व अधिवेशन समारंभात अध्यक्षपदावरून ते बोलत होते यावेळी या विद्यालयाचे कुलगुरू प्राचार्य श्रीधर कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी ऋतुजा ठोंबरे हिने उपस्थित यांचे स्वागत करून प्रथम सत्रात स्वाती सुतार__नवमाश कुंडली रहस्य, सपना परांजपे__पंचम स्थान सचिन बेहेरे, वास्तुशास्त्र, अमरनाथ स्वामी__विवाह संस्कार या विषयावर मनोरंजक व्याख्याने झाली यानंतर दुसऱ्या सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ज्योतिष भास्कर, ज्योतिष विशारद, या पदवीने सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना कुलगुरू श्रीधर कुलकर्णी यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाशी प्रामाणिक राहून समुपदेशकाचे काम करावे तसेच आलेला जातक कसा समाधानी होईल ते पहावे असे सांगितले या कार्यक्रमासाठी ज्योतिष प्रेमी, उद्योजक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी स्वाती सुतार यांनी आभार मानले.
( फोटो वेदमूर्ती नंदकुमार जोशी यांचा सत्कार करताना श्रीधर कुलकर्णी कुलगुरू व अमरनाथ स्वामी)