मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
लोहगाव (वार्ताहर) हनुमंतगाव तालुका राहाता येथील यशवंत बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित बटरफ्लाय प्रि स्कूल च्या मुलांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले, यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये विविध कलागुणांचे दर्शन घडवले, सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे बाल गोकुलम इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हार च्या प्राचार्या सो. मोरे मॅडम तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवरा हायस्कूल बाभळेश्वरच्या मुख्याध्यापिका सौ. भोंडे मॅडम यांनी भूषविले. सदर कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बटरफ्लाय पी स्कूलच्या प्रिन्सिपल सो. राजश्री बुचूडे मॅडम यांनी उत्कृष्ट प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश रोडे सर यांनी केले यावेळी पालक विद्यार्थी व गावातील नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.